केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील समुद्रात मासेमारीची मुभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील समुद्रात मासेमारीची मुभा
केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील समुद्रात मासेमारीची मुभा

केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील समुद्रात मासेमारीची मुभा

sakal_logo
By

KOP22L42147
रत्नागिरी ः केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची पर्ससीननेट मच्छीमार नेत्यांनी भेट घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महेश बाल्दी, गणेश नाखवा, नासिर वाघू, अमोल रोगे, रमेश नाखवा, सुरेश डहाणू, आनंद बुरांडे आदी उपस्थित होते.


केंद्राच्या अधिकारक्षेत्रात समुद्रात मासेमारीची मुभा
पर्ससीनवाल्याना दिलासा ; जानेवारी ते मे बंदी काळात संधी
रत्नागिरी, ता. ९ ः कोकणातील पर्ससीननेटधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मे महिन्याच्या मासेमारी बंदीकाळात केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील समुद्रात मासेमारी करण्यासाठी आता मुभा मिळणार आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची पर्ससीननेट मच्छीमार नेत्यांनी भेट घेतली. त्या वेळी रूपाला यांनी नौकांना मासेमारी करण्यासाठी लवकरच परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे मच्छीमार नेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने गेल्यावर्षी सागरी मासेमारी कायद्यात सुधारणा केली. या सुधारित कायद्यानुसार जानेवारी ते मे महिन्यातील पर्ससीननेट मच्छीमार नौकांना केंद्राच्या अखत्यारितील १२ नॉटिकल मैलाबाहेर समुद्रात मासेमारी करण्यासही मज्जाव होता.कोकणातील नौकामालकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरक अशा अनेक उद्योगांवर परिणाम झाल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांचेही नुकसान झाले.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, डहाणूचे आमदार महेश बाल्दी यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार नेते गणेश नाखवा, नासिर वाघू, अमोल रोगे, रमेश नाखवा, सुरेश डहाणू, आनंद बुरांडे यांनी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेतली.
मत्स्योद्योगासमोरच्या समस्या मांडल्या. या समस्यांमध्ये जानेवारी ते मे महिन्यातील राज्याच्या समुद्रातील मासेमारी बंदीकाळात केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील मासेमारी करण्यास दिली जात नाही. केंद्राच्या समुद्रातून मासेमारी करून येणाऱ्या नौका पकडून त्यांच्यावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई होत आहे. त्यामुळे हा उद्योगच धोक्यात आला असल्याची व्यथा मांडली.
१ सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरू होणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या ७ जिल्ह्यांना ७२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे. या किनारपट्टीवर ५ ते ६ हजार पर्ससीननेट नौका मासेमारी करतात. प्रत्येक नौकेवर ३५ ते ४० खलाशी, तांडेल, काम करतात. त्याचबरोबर या मासेमारीवर अनेक उद्योग अवलंबून आहेत. या सर्वांचा केंद्राच्या अधिकृतक्षेत्रातील समुद्रात मासेमारी करण्यास मुभा मिळाल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कोट...
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सचिवांना सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे येत्या १५ दिवसात पर्ससीननेट मच्छीमारांना दिलासा देणारी कार्यवाही केंद्राकडून होऊन राज्य सरकारकडून त्याचा दिलासा मिळेल.
- नासिर वाघू, मच्छीमार नेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85669 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..