राजापूर ः अतिवृष्टीचा फुपेरे, कुंभवडे शाळाना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः अतिवृष्टीचा फुपेरे, कुंभवडे शाळाना फटका
राजापूर ः अतिवृष्टीचा फुपेरे, कुंभवडे शाळाना फटका

राजापूर ः अतिवृष्टीचा फुपेरे, कुंभवडे शाळाना फटका

sakal_logo
By

rat9p47.jpg ःKOP22L42070 राजापूर ः कुंभवडे पाळेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील कोसळलेली संरक्षक भिंत.


अतिवृष्टीचा फुपेरे, कुंभवडे शाळाना फटका
---
राजापुरात इतरत्र पुराने हानी किरकोळ

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 9 ः अर्जुना-कोदवली नदीच्या पूरस्थितिमध्ये शहरातील बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले असले तरी, व्यापार्‍यांच्या सतर्कतेमुळे फारसे कोणाचेही नुकसान झालेले नाही. मात्र, ग्रामीण भागातील कुंभवडे पाळेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील संरक्षक भिंत आणि फुपेरे येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 च्या एका वर्गाचे छप्पर कोसळून नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यामध्ये सातत्याने पडणार्‍या पावसाने आज दिवसभर विश्रांती घेतली होती. त्यातून, अर्जुना-कोदवली नद्यांना आलेला पूरही ओसरला आहे. दरवर्षीच्या पूरस्थितीचा अनुभव असल्याने व्यापारीवर्ग आधीच सतर्क झालेला होता. त्यातून व्यापार्‍यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवला होता. त्यामुळे पुराचे पाणी दुकानांमध्ये घुसूनही व्यापार्‍यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, कुंभवडे पाळेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील संरक्षक भिंत कोसळून आणि फुपेरे येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 च्या इमारतीच्या छप्पराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे.

चौकट ः
दृष्टिक्षेपात राजापूरचा पाऊस
तारीख सरासरी पाऊस (मि.मी.) एकूण पाऊस
8.8.022 123.75 2187.885
9.8.022 96.50 2284.385

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85671 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..