रत्नागिरी ः13 ऑगस्टला रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः13 ऑगस्टला रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅली
रत्नागिरी ः13 ऑगस्टला रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅली

रत्नागिरी ः13 ऑगस्टला रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅली

sakal_logo
By

----------
रत्नागिरीत शनिवारी ‘एकता तिरंगा’ रॅली
जय्यत तयारी सुरू ; सर्वाना सामील होण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. ९ ः आजादी का अमृतमहोत्सव साजरा होत असताना १३ ऑगस्टला रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुचाकी आणि रिक्षा यांची भव्य रॅली रत्नागिरीत निघणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या रॅलीमध्ये तमाम रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
देशभरात ‘आजादी का अमृतमहोत्सव’ हा कार्यक्रम सुरू आहे. रत्नागिरीतदेखील एखादा भव्य कार्यक्रम व्हावा, अशी मागणी होत असताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरीतील सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्यानुसार रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. रत्नागिरीत १३ ऑगस्टला सकाळी ८.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून या रॅलीला सुरवात होणार आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिसदल यांसह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीसाठी मराठी पत्रकार परिषद, हेल्पिंग हॅण्ड, श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळ व व्यापारी संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरीकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, या रॅलीला सकाळी ८.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरवात होणार आहे. ही रॅली बसस्थानक, रामआळी, गोखले नाका, काँग्रेसभवन, प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजारमार्गे बसस्थानक, जयस्तंभ येथून मारुती मंदिर येथे जाणार आहे. तेथून ही रॅली पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येणार असून संविधानाची शपथ घेऊन या रॅलीची सांगता केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85676 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..