दाभोळ ः सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्यांची चोरी
दाभोळ ः सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्यांची चोरी

दाभोळ ः सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्यांची चोरी

sakal_logo
By

--
सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्यांची चोरी

३ संशयितांविरूद्ध दापोलीत गुन्हा दाखल
दाभोळ, ता. ९ ः दापोली तालुक्यातील हर्णै येथील महाकाली सॉ मिलच्या गडग्याच्या चिऱ्याचे दगड व जळाऊ लाकूड चोरल्याच्या तक्रारीवरून ३ संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञानी वरवडेकर यांची हर्णै येथे महाकाली सॉ मिल आहे. ६ ऑगस्टला सकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या सॉ मिलशेजारी राहणाऱ्यांचा फोन आला की, तुमच्या जागेतील गडगा जेसीबीने फोडून ते दगड ट्रॅ़क़्टर ट्रॉलीतून नेले जात आहेत. त्यानंतर वरवडेकर हर्णै येथे आले असता त्यांना त्यांच्या जागेतील गडगा तोडलेला दिसला. त्यांनी जेसीबी चालकाला विचारले असता त्याने सॉ मिलशेजारी राहणाऱ्या मुरली मेहता याने सांगितल्याने हा गडगा तोडला असल्याचे संगितले व गडग्याचे चिऱ्याचे दगड ट्रॅक़्टर ट्रॉलीत टाकले, असे सांगितले. त्यानंतर वरवडेकर यांनी मुरली मेहता याला हा काय प्रकार आहे, हे विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तो घरात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा वरवडेकर यांनी जेसीबी चालक व ट्रॅ़क्टर चालक यांना मी न्यायालयाचे काम करून येतो. तुम्ही येथेच थांबा, असे सांगितले व ते दापोलीत आले व सायं. ७.३० वा. पुन्हा हर्णै येथे आले असता ते दोघेही दगड जागेवर ओतून निघून गेल्याचे त्याच्या नोकराने सांगितले.
त्यानंतर वरवडेकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात जाऊन १ हजार ५०० रुपये किमतीचे ५० चिरे, ३ हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड असे ४ हजार ५०० रु. किमतीचे साहित्य संशयित मोहन राठोड, सुनील राठोड यांनी मुरली मेहता यांच्या सांगण्यावरून चोरल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल दीपक गोरे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85679 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..