हुतात्म्यांचे सदैव स्मरण गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्म्यांचे सदैव स्मरण गरजेचे
हुतात्म्यांचे सदैव स्मरण गरजेचे

हुतात्म्यांचे सदैव स्मरण गरजेचे

sakal_logo
By

42116
करूळ ः क्रांती दिनी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर तहसीलदार रमेश पवार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने आदी.

हुतात्म्यांचे सदैव स्मरण गरजेचे

तहसीलदार पवार ः करूळ येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन

कणकवली,ता. ९ ः भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी हौतात्म्य पत्करले, अशा हुतात्म्यांना विसरून चालणार नाही. त्यांच्या स्मृती सतत जतन करून ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रमेश पवार यांनी केले.
क्रांती दिनानिमित्त करुळ (ता.कणकवली) येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला आज आभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालय, ग्रामपंचायत व नाथ पै ज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तहसीलदार बोलत होते.
वेशभूषा स्पर्धेने कार्यक्रामाला प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक व स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. करूळ हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूहगीते व स्फूर्तिगीते सादर केली. तसेच करूळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून स्वच्छतेविषयी जागृती केली. प्रारंभी हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आले.
सरपंच बबन कर्णिक तसेच करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नारकर, मंडल अधिकारी दिलीप पाटील यांनी हुतात्म्यांच्या आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रमात प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सरपंच वासुदेव उर्फ बबन कर्णिक, उपसरपंच श्री.गोमणे, पोलिसपाटील श्री. जाधव, हुतात्मा कर्णिक यांचे वंशज चंदन कर्णिक, सामाजिक कार्यकर्ते गणेश जेठे, करूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.नारकर, मंडल निरीक्षक दिलीप पाटील, मंडल अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई, केंद्रप्रमुख जुईली सावंत, तिवरे प्राथमिक शाळा शिक्षक श्री. कदम, रोटरी क्लबचे डॉ. विद्याधर तायशेटे, सुहास पावसकर, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते. आर. जी. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. एस. एल. खटावकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85711 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..