पान तीन मेन-वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक ठप्प
पान तीन मेन-वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक ठप्प

पान तीन मेन-वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक ठप्प

sakal_logo
By

टीपः swt९३९.jpg मध्ये फोटो आहे.
गगनबावडा ः मांडकुली येथे रस्त्यावरून पुराचे वाहत असलेले पाणी.


वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक ठप्प

मांडकुलीत पुराचे पाणी; फोंडा, आंबोली घाटाचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः गगनबावडा तालुक्यातील मांडकुली येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वैभववाडीतून कोल्हापुरकडे जाणारे सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. करूळ घाट रस्ता खचल्यामुळे यापुर्वीच तळेरे-गगनबावडा मार्गावरील वाहतुक रविवारी (ता.७) रात्रीपासून बंद झाली होती. जिल्ह्यातून सध्या फोंडाघाट आणि आंबोलीमार्गे वाहतुक सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाट रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक करूळ घाटाला पर्यायी असलेल्या भुईबावडा घाटमार्गे आणि अवजड वाहतुक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली. आता भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर जाण्याचा वैभववाडीतील एकमेव पर्याय मांडकुली (ता.गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे बंद झाला आहे. सोमवारी (ता.८) रात्री उशिरापासून ही वाहतुक बंद झाल्यामुळे भुईबावडा घाटमार्गे गगनबावड्यापर्यत गेलेल्या वाहनचालकांना माघारी परतावे लागले. याशिवाय कोल्हापूरहुन वैभववाडीकडे येत असलेल्या वाहनांना अर्ध्यावरून पुन्हा कोल्हापुर जाऊन फोंडाघाट मार्गे यावे लागले. जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या फोंडा आणि आंबोली हे घाटमार्गे वाहतुक सुरू आहे.
खचलेल्या करूळ घाटरस्त्यांची राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी पाहणी केली. खचलेल्या ठिकाणी नेमकेपणाने काय करता येईल, याचा अहवाल ते वरिष्ठांकडे देणार आहेत. त्यानंतर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार खचलेच्या रस्त्यांच्या पुर्नबांधणीचा निर्णय होणार आहे. जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर किंचीत ओसरला आहे. मात्र, अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर ओसरल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील घट झाली आहे.
--------------
चौकट
मोटार, दुचाकीबाबत चर्चा
वाहतुक बंद करण्यात आलेल्या करूळ घाटमार्गे काम पूर्ण होईपर्यत वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय तुर्तास प्रशासनाने घेतला असला तरी महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्ये दुचाकी, मोटार या मार्गे सुरू करता येईल का? याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. येत्या एक दोन दिवसांत त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
------------
कोट
खचलेल्या करूळ घाटरस्त्यांची पाहणी केली. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार पुढील काम करण्यात येईल.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, महामार्ग प्रधिकरण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85724 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..