पान एक-ट्रक अपघातात चालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-ट्रक अपघातात चालक ठार
पान एक-ट्रक अपघातात चालक ठार

पान एक-ट्रक अपघातात चालक ठार

sakal_logo
By

swt937.jpg मध्ये फोटो आहे.
४२११९
ओळ - मालवण ः कुपेरीची घाटी येथील रस्त्यावर चिरे वाहतुकीचा ट्रक झाडावर आदळून अपघात झाला.

ट्रक अपघातात चालक ठार
चौकेतील घटना ः क्लिनर गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ः चौके येथून कर्नाटक येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक चौके-कसाल मार्गावरील कुपेरीच्या घाटीत उतारावर मोठ्या झाडाला धडकल्याने अपघात झाला. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अर्जुन ईश्वर नाईकप्पागोल (वय ३०, रा. नायकरओनी यरगनवी, ता. सौदती, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडला.
समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर चालकाचा मृतदेह बराच वेळ आतमध्ये अडकून होता. त्याला बाहेर काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अपघात एवढा भयंकर होता की, ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. ट्रकचा दर्शनी भाग आणि झाड यांच्यात चालक अडकून पडला होता. या अपघातात क्लिनरचा कान पत्रा लागून फाटल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कट्टा दूरक्षेत्र पोलिसांसह वाहतूक पोलिस डी. एस. तारी, एम. बी. देऊलकर, नितीन शेट्ये, ए. एन. गायतोंडे, पी. पी. ओरसकर तसेच चिरेखाण व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. ट्रकमधील चिरे बाजूला करत ट्रक बाजूला करून आत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातात ट्रकची चेस सुटून सुमारे दोन फूट पुढे गेल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85726 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..