माजी, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना गुणांची सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना गुणांची सवलत
माजी, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना गुणांची सवलत

माजी, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना गुणांची सवलत

sakal_logo
By

माजी, शहीद सैनिकांच्या
कुटुंबीयांना गुणांची सवलत
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही व नावातील स्पेलिंग बदल व जात संवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांनाकडून निवेदन प्राप्त होत आहेत. उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग जात संवर्ग बाबतची दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करण्यासाठी व माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता सुविधा https://mahatet.in या संकेत स्थळावरील उमेदवारांच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेली आहे. निवेदन १० ऑगस्टपर्यंत देणे आवश्यक आहे. नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एस.एस.सी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र, माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी ईमेलव्दारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुनश्य: आपले लॉनिगमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. मुदती नंतर अन्य प्रकारे (ईमेल, फोनसंदेश, लेखी पत्र इत्यादी) आपलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
---
गस्ती नौकांबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत ई - निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन गस्ती नौका उपलब्ध होईपर्यंत २०२२-२३ करिता जिल्हा कार्यालयस्तरावर १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दोन महिन्यांच्या कालावधीकरिता तात्पुरत्या गस्ती नौका उपलब्ध करून घेण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी स्थानिक व्यवस्था करून गस्ती नौका कार्यान्वित करण्याकरिता अर्ज व दरपत्रक मागविण्यात येत आहेत. अधिनस्त नौकामालकांना याबाबत तत्काळ माहिती देऊन गस्तीसाठी नौका उपलब्ध करून देण्यास इच्छुक असलेल्या नौकामालकांनी १० ऑगस्टपूर्वी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) कार्यालयसास सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभाग सहायक आयुक्त र. ग. मालवणकर यांनी दिली.
...............
नेहरू युवा केंद्रातर्फे ‘घरोघरी तिरंगा’
सिंधुदुर्गनगरी ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत नेहरु युवा केंद्रातर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. युवा मंडळ विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रत्येक गावात युवा मंडळ स्थापन करण्यात येत आहेत. १५ ऑगस्टपर्यंत स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र गावाधारित संलग्न युवा क्लबच्या माध्यमातून युवा सक्षमीकरणाचे विविध उपक्रम हाती घेते. ज्यामुळे राष्ट्र उभारणी प्रक्रियेत युवकांचा सहभाग सुलभ होतो. प्रत्येक मंडळ जोडताना त्यात कमीतकमी सात सदस्य आवश्यक आहेत. सर्व सदस्यांची वयोमर्यादा १५ ते २९ वर्षे अशी आहे. अध्यक्ष, सचिव, खजिनदारांची वयोमर्यादा १८ ते २९ वर्षे आहे.
---
वैभववाडीत सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ८०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकूण सरासरी २२८७.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ३७.८ (१९३४.९), मालवण- ३६.६(२११९.४), सावंतवाडी- ४२.९ (२५७०.४), वेंगुर्ले- ३०.२ (२२०६.५), कणकवली- ५५.९ (२३५५.४), कुडाळ- ३८.१ (२३९०.१), वैभववाडी-८०.३ (२५३१.७ ), दोडामार्ग- ४६.३ (२५३५.४).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85732 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..