मळगावात आज हरिनाम सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगावात आज हरिनाम सप्ताह
मळगावात आज हरिनाम सप्ताह

मळगावात आज हरिनाम सप्ताह

sakal_logo
By

४२२१३
देव रवळनाथाची मूर्ती.

मळगावात आज
हरिनाम सप्ताह
सावंतवाडी ः मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दोन दिवसीय सात प्रहरांचा वार्षिक हरिनाम सप्ताह उद्या (ता.११) साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, श्री देव रवळनाथ देवावर अभिषेक, होमहवन, मंत्रपठण, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सकाळपासून मळगाव येथील सावळवाडा, पाडगावकरवाडी, वरची देऊळवाडी, सुतारवाडी, खालची देऊळवाडी, कुंभारवाडी, तेलकाटावाडी, तेलीवाडी, कुडववाडी, जोशी मांजरेकरवाडी, नाईकवाडी, बांदेकरवाडी, कुंभारआळी आदी स्थानिक भजनमंडळांची भजने होणार आहेत. शुक्रवारी महाप्रसादाने सांगता होईल.
----
हरिनाम सप्ताहास
शिरोड्यात प्रारंभ
वेंगुर्ले ः येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह (वीणा सप्ताह) सुरु असून शुक्रवारी (ता.१२) दहिकाला-प्रसाद वाटप होऊन वार्षिक सोहळ्याची सांगता होणार आहे. गुरुवारी दिंडीरथ परबवाडीतील श्री देव रामपुरुष मंदिराकडून ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात देवी माऊली मंदिराकडे येईल. शुक्रवारी सायंकाळी दहीहंडी फोडणे झाल्यावर प्रसाद वाटप होईल. रात्री विश्वनाथ परब मित्रमंडळातर्फे संयुक्त दशावतारचे ‘उषा स्वप्न बाणासूर’ नाटक होणार आहे.
-----------------
बावळाट-सातुळी
बसफेरी पूर्ववत
ओटवणे ः बावळाट व सातुळी ग्रामस्थांच्या दणक्यानंतर सावंतवाडी बसस्थानकातून सुटणारी सव्वानऊची बावळाट बस अडीच वर्षांनंतर सोमवारपासून पूर्ववत करण्यात आली. कोरोनानंतर ही सकाळची बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे केसरकर समर्थक माजी सभापती अशोक दळवी, गजानन नाटेकर यांच्यासह दया परब, सुरेश कदम, कमलाकर लातये आदींनी स्थानक प्रमुख नरेंद्र बोधे यांना जाब विचारला होता. यावेळी विभाग नियंत्रक खराडे यांनी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
--
न्हावेलीत सोमवारी
समूहगीत स्पर्धा
सावंतवाडी ः न्हावेली शाळा क्रमांक ४ मध्ये सोमवारी (ता.१५) गुरुकुल संगीत विद्यालयातर्फे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा होणार आहे. न्हावेलीतील सर्व शाळा व ग्रामपंचायतीतर्फे स्पर्धेचे नियोजन केले आहे. १५ ला चारही शाळांमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी तीनला ही स्पर्धा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85821 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..