फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L४२२३८
आंबडोस ः व्हाळवाडी शाळेत राष्ट्रगीत गाताना विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षक.

आंबडोस शाळेत विविध कार्यक्रम
ओरोस ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वराज्य महोत्सव कार्यक्रमांतर्गत मालवण तालुक्यातील आंबडोस-व्हाळवाडी जिल्हा परिषद प्रशालेत विविध कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. ९ ला सकाळी ११ वाजता व्हाळवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन पार पडले. यासाठी लाऊडस्पीकरची सोय करण्यात आली होती. त्याचवेळी वाडीतील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरी राष्ट्रगीत गायन केले. हा अनुभव सर्वांसाठी सुखद असा होता. १० पासून विविध स्पर्धा व कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक परब, मुख्याध्यापक रुपाली कुबल-चव्हाण, सहाय्यक शिक्षक मारुती चव्हाण, अंगणवाडी सेविका निकिता परब, शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष संजय इंदुलकर, सतीश दळवी, दीपक नके, बापू भोसले, चंद्रकला साळगावकर, सुंदरी चव्हाण, समृध्दी दळवी, काजल दळवी, सत्यवती फाटक, साक्षी साळगावकर, सायली साळगावकर आदी उपस्थित होते.
.............
मालवणात १७ ला ग्रंथप्रदर्शन
मालवण : येथील नगर वाचनमंदिरच्यावतीने १७ ला ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नगर वाचनमंदिर आयोजित देशभक्तीपर विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहाला करण्यात येणार आहे. तर देशभक्तीपर गीतांचा सुश्राव्य कार्यक्रम सायंकाळी चारला ग्रंथालयाच्या वाचनकक्षात आयोजित केला आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी उदयराव मोरे, नागेश कदम यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85841 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..