फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L४२२४२

ओळ - मळगाव ः येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वनन करताना मान्यवर.

खानोलकर वाचनालयातील
ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद
सावंतवाडी ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात राष्ट्रप्रेम व क्रांतीकारकांवरील पुस्तकांचे प्रदर्शन सोहळा झाला.
याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याचे उद्धाटन दिपप्रज्वलन करुन श्री. सामंत व यशवंत राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी वाचन मंदिराचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक महेश पंतवालावलकर, सौ. स्नेहा खानोलकर, ग्रंथपाल आनंद देवळी, सौ. पूर्वा नार्वेकर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्या माहितीपर ग्रंथाचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल. या वाचन मंदिराने राबविलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन यावेळी मळगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक भिकाजी सामंत यांनी केले. वाचनालयाचे सचिव नार्वेकर यांनी प्रास्ताविक करून वाचनालय करीत असलेले उपक्रम व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाविषयीच्या कार्यक्रमाची माहिती सांगितली. हे ग्रंथ प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत खुले राहणार असून याचा लाभ विद्यार्थी वर्गाने व वाचकांनी घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्यावतीने केले आहे.
.................
L४२२४३

ओळ - सावंतवाडी ः सामुहिक राष्ट्रगीत स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
सेंट्रल स्कूलमध्ये ''सामूहिक राष्ट्रगीत'' गायन
सावंतवाडी ः येथील मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ''सामूहिक राष्ट्रगीत'' गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. सर्वांनी मिळून राष्ट्रगीताचे गायन केले.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85845 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..