देवरूख ः सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ताम्हाणे हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्याला उदंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ताम्हाणे हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्याला उदंड प्रतिसाद
देवरूख ः सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ताम्हाणे हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्याला उदंड प्रतिसाद

देवरूख ः सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ताम्हाणे हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्याला उदंड प्रतिसाद

sakal_logo
By

rat१०p२३.jpg-
४२२६०
पूर्णगडः सेवानिवृत्त पोलिसांना हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत तिरंगाचे वाटप करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, अवधूत सुर्वे आदी.
------------
सेवानिवृत्त पोलिसांना दिला तिरंगा
पावसः पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस कॉन्स्टेबल अनिल तोडणकर, शांताराम रहाटे, शफी मालवणकर, सूर्यकांत साळवी यांना आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त पोलिसांमध्ये या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलेले आहे. ही संकल्पना पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून साकारलेले असून उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पना राबविण्यात आली आहे.
-----
ताम्हाणे हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
देवरूखः आई-वडील आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात. परंतु खऱ्या अर्थाने जगायला मात्र शाळा आणि शाळेतील गुरूजन शिकवतात. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण आई-वडिलांबद्दल आयुष्यभर जाणीव ठेवतो, त्याचप्रमाणे शाळेच्या बाबतीतही जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडायला हवीत, अशी भावना माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात केली. ताम्हाणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणे या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सध्या साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने १ जानेवारी २०२३ पर्यंत शाळेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. कार्यक्रमाचे नियोजन करताना त्यात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, या अपेक्षेने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. डिसेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी तसेच निधी संकलनासाठी माजी विद्यार्थ्यांची २५ जणांची एक समिती स्थापन करण्यात आली. शाळेचे माजी विद्यार्थी व वरिष्ठ सरकारी अधिकारी (निवृत्त) संजय कांबळे यांची या समितीच्या अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सरपंच देवदत्त शेलार यांची तर ताम्हाणेचे विलास गायकर यांची दुसरे उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी विद्यार्थी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी शाळेला माजी विद्यार्थी म्हणून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. संस्थाध्यक्ष अशोक सप्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85863 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..