चिपळुणात उड्डाणपुलाचे टेक ऑफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात उड्डाणपुलाचे टेक ऑफ
चिपळुणात उड्डाणपुलाचे टेक ऑफ

चिपळुणात उड्डाणपुलाचे टेक ऑफ

sakal_logo
By

ratchl१०२.jpg-
४२२७३
चिपळूणः बहादूरशेख येथे सुरू असलेले उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीचे काम.
------------
चिपळुणात उड्डाणपुलाचे टेक ऑफ
४६ पैकी १३ पिलर अंतिम टप्प्यात ; २०० कामगार वाढवणार
चिपळूण, ता. १० ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. भर पावसातही काम सुरू असून एकूण ४६ पैकी १३ पिलर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मार्गदर्शनाखाली ईगल कंपनीने पुढील वर्षात हा पूल उभारण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. येत्या काही दिवसात आणखी दोनशे कामगार वाढवून पुलाच्या कामाला आणखी गती देण्याची तयारी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गकडून केली जात आहे.
महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अजूनही समाधानकारकपणे सुरू नाही. त्यातील परशुराम ते आरवली दरम्यानचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. अजूनही काही भागातील जागा ताब्यात घेणे, मोऱ्या व गटारे उभारणे अशी कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किमीच्या अंतरातील हे काम अजूनही अपुरे आहे. कापसाळ, कामथे व सावर्डे या भागात काही ठराविक अंतराचे काँक्रिटीकरण झाले असले तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरवात झालेली नाही. चेतक कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू होते. या कंपनीने योग्य पद्धतीने हे काम न हाताळल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आमदार भास्कर जाधव यांनी या कंपनीच्या कामाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच नवीन ठेकेदार नेमण्याची मागणीही केली होती. त्यामुळे आता कंपनीचे सहहिस्सेदार असलेल्या ईगल कंपनीने या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. यापुढे हीच कंपनी हे काम मार्गी लावणार असून काही भागात कामालाही सुरवात केली आहे. चौपदरीकरण कामांतर्गत महत्त्वाचा टप्पा असलेल्या उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले असून या कामालाही वेग आला आहे.
पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारले जाणार आहेत. त्यापैकी १३ पिलरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच जोडीला काही ठिकाणी पाईल कॅपिंगचेही काम केले जात आहे. सध्य स्थितीत दीडशे कामगार या पिलरच्या उभारणीचे काम करत आहेत. तर पावसाळ्यानंतर अजून दोनशे कामगारांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी श्री. निगडे यांनी दिली.
-----------
चौकट
पुलाची लांबी १८४० मीटर, रुंदी ४५ मीटर
या महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल येथे उभारला जात आहे. शहरातील बहादूरशेख नाका येथून सुरू होणारा उड्डाणपूल युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पुढेपर्यंत असणार आहे. साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे काम एकाच वेळी चार ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85874 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..