संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat१०p२.jpg
४२१९६
ः राजापूर ः श्रमसाफल्य सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभेत मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष राजाराम राघव.
-----------
श्रमसाफल्य पतसंस्थेचा ८ टक्के लाभांश
राजापूर ः श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था मर्यादित, खार (पूर्व) या पतसंस्थेच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम राघव यांच्या अध्यक्षतेखाली सांताक्रुझ येझे झाली. सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, नफा-तोटा पत्रक, जमा-खर्च वाचून मंजूर करणे, लाभांश जाहीर करणे आदी विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. सभासदांच्या दहावी, बारावी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या पाल्यांचा पतसंस्थेच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. अध्यक्ष राघव यांनी पतसंस्थेच्या वाटचालीत योगदान देणार्‍या सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, सभासद हितचिंतक यांना धन्यवाद दिले.
--------------------------------
क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन
राजापूर ः ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी लढ्यामध्ये अनेकांनी सहभागी होत योगदान दिले आहे. या क्रांतिकारकांच्या स्मृतींना क्रांतिदिनी आमदार राजन साळवी यांनी उजाळा दिला. या वेळी त्यांनी लांजा येथील स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भाऊसाहेब वंजारे यांचा आमदार डॉ. साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, गटशिक्षणाधिकारी विजय बंडगर, नगरपंचायतीचे अविराज पाटील आदी उपस्थित होते.
---------
प्रभात हायस्कूलमध्ये गणवेश वाटप
खेड ः तालुक्यातील शिवतर येथील प्रभात हायस्कूल येथे उद्योजिका राजश्री मोरे यांनी ५२ हजार रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ८० गणवेशांचे व्हाईस चेअरमन शशिकांत कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याच वेळी जयवंत मोरे यांनी हायस्कूलच्या इमारतीसाठी १ लाखांची देणगी दिली. संस्थेच्यावतीने उद्योजिका राजश्री मोरे, अरविंद मोरे, जयवंत मोरे, सुभाष मोरे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी काशिनाथ मोरे, व्हा. चेअरमन सुभाष मोरे, शिवाजी मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरेश वारण यांनी प्रशालेच्या सभागृहासाठी निधी देण्याचे जाहीर केले.
---
-rat१०p२२.jpg
L42259
ः खेड ः आयसीएसमध्ये मनविसेच्या युनिट फलकाचे अनावरण करताना वैभव खेडेकर.
-------------------
मनविसेच्या युनिट फलकाचे अनावरण
खेड ः खेड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आयसीएस महाविद्यालयात युनिट फलकाचे अनावरण मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मनविसेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, मंडणगड तालुकाध्यक्ष नवज्योत गौड, शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, विभाग अध्यक्ष पियुष माने, प्रथमेश बनप, साई साळुंखे, सर्वेश पवार, जय पासवान आदी उपस्थित होते.
------------------
हजवानी स्कूल समिती चेअरमनपदी पटेल
खेड ः अल मदिना वेल्फेअर असोसिएशन संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समिती चेअरमनपदी सिराज पटेल यांची संचालक मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली. अनेक वर्षापासून ते संस्थेत कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्थावरही ते क्रियाशील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष बशीर हजवानी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मन्सूर मुकादम, शौकत मुजावर, गुलाम तांबे, तालुका जमी जमातुल मुस्लिमिनचे जलाल कादिरी, आरिफ मुल्लाजी, दाऊद कादिरी, रऊफ खतीब आदी उपस्थित होते.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85890 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..