सिंगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगल
सिंगल

सिंगल

sakal_logo
By

आरपीडी हायस्कूलतर्फे
१३ ला वक्तृत्व स्पर्धा
सावंतवाडी, ता. १० ः येथील शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूलच्यावतीने (कै.) नामदार भाईसाहेब सावंत यांच्या स्मरणार्थ १३ ऑगस्टला सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्गातील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धेसाठी ज्युनियर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा संघ किंवा वैयक्तिक एका विद्यार्थ्याला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्याला फिरता चषक तसेच प्रथम क्रमांकास ३०००, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय २०००, चषक व प्रमाणपत्र, तृतीय १०००, चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना ५०० व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी या वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्गातील बहुसंख्य ज्युनियर कॉलेजनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक, संस्थेचे खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक-धुरी तसेच स्पर्धा समिती प्रमुख प्रा. केदार म्हसकर यांनी केले आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85892 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..