कणकवली : कातकरी सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : कातकरी सत्‍कार
कणकवली : कातकरी सत्‍कार

कणकवली : कातकरी सत्‍कार

sakal_logo
By

42304
कणकवली : शहरातील कातकरी मुलीच्या सत्‍कार प्रसंगी तहसीलदार रमेश पवार व अखंड लोकमंच संस्थेचे पदाधिकारी.


कातकरी समाजाला दिशा प्रेरणादायी

तहसीलदार पवार ः कणवलीत समाजातील गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव


कणकवली, ता.१० : शाळा, पुस्तकं, शिक्षण यांच्यापासून आजही कोसो दूर असलेल्‍या कातकरी समाजातील मुलीला शिक्षणासाठी प्रवृत्त करणे आणि तिला उच्च शिक्षित होण्यासाठी सतत प्रेरणा देणाऱ्या अखंड लोकमंच संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रमेश पवार यांनी येथे केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखंड लोकमंच सिंधुदुर्गच्या श्रमिक मुक्तीवेध शाखेच्यावतीने कणकवली स्वामी आर्ट येथे शिल्पा पवार या विद्यार्थिनीचा सत्कार तहसीलदार श्री.पवार यांच्याहस्ते झाला. शिल्पा पवार ही कातकरी समाजातील पहिली एसएससी गुणवंत विद्यार्थिनी आहे. या सत्कार सोहळ्याला तहसीलदार आर.जे.पवार यांच्यासह डॉ.विद्याधर तायशेटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, नामानंद मोडक, संस्थेचे पदाधिकारी व्ही.के.सावंत, बाळू मिस्त्री, संतोष राऊळ, विनायक साबळे, राजेश कदम, संतोष कांबळी, निलेश पवार, कवयित्री सरिता पवार, किरण कदम, शैला कदम, शिक्षक किशोर कदम, कल्पना मलये, कातकरी प्रतिनिधी बबन पवार आदी उपस्थित होते.
नैसर्गिक जगण्यातून आदिवासींनी आपणाला लोकशाहीचं, सहजीवनाचं मॉडेल बहाल केलं; पण त्याच आदिवासींना आता शोषणाला बळी पडणं भाग होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने याची जाणीव ठेवून क्रांती दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे आयोजन केले. त्यानुसार अखंड लोकमंच सिंधुदुर्गच्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम सुद्धा समाजाला प्रेरणा देणारा आहे, असे मत अभिनेते निलेश पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85905 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..