दाभोळ-दापोली उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोली उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा
दाभोळ-दापोली उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा

दाभोळ-दापोली उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा

sakal_logo
By

दापोली उपजिल्हा रुग्णालयात
रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा
दाभोळ, ता. १०ः ऑगस्टमधील पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. या सप्ताहानिमित्ताने दापोली उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धा झाली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान रामराजे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज व रामराजे कॉलेज येथील ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या वेळी डॉ. सुरेश कुराडे, डॉ. प्रदीप बनसोडे, डॉ. गीतम राऊत, डॉ. पल्लवी तपासे, डॉ. भांबीड, डॉ. दीक्षा पांडे, डॉ. समर्थ पेंढारी, डॉ. शेट्ये, अनघा घाग, निर्मला बैकर, चंद्रशेखर रिसबूड, सदानंद गित्ते, मयूर पराळे, संपत कान्हेरे, गजानन सावर्डेकर, दीपिका नांदगावकर, निकिता घुगरे, गायत्री भाटकर, प्रिया वंडकर, स्नेहल गोफने, जोगेश्वरी वळवी, अर्चना वसावे, मालिनी वसावे, अस्मिता जाधव, दिपाली पवार आदी उपस्थित होते.
स्तनपान सप्ताहानिमित्ताने दापोलीतील मातांना रांगोळी व पोस्टरमधून एक चांगला संदेश पोहचवण्याचा मार्ग म्हणून डॉ. गितम राऊत, डॉ. पल्लवी तपासे व पांडुरंग हुबाळे, आयसीटीसी समुपदेशक यांनी या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमास आंतरवसिता डॉ. प्रतीक भांबुरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85910 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..