मंडणगड - कुणबी गुणगौरवाचे सामाजिक प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - कुणबी गुणगौरवाचे सामाजिक प्रोत्साहन
मंडणगड - कुणबी गुणगौरवाचे सामाजिक प्रोत्साहन

मंडणगड - कुणबी गुणगौरवाचे सामाजिक प्रोत्साहन

sakal_logo
By

rat10p11.jpg ः
42203
नालासोपाराः डॉक्टर झालेल्या प्रिया भोजने हिचा गौरव करताना निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले, भाई पोस्टुरे व मान्यवर.
--------------
विविध क्षेत्रातील गुणवंतांचा
कुणबी सेवा संघातर्फे गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ः मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ मुंबई विभागाच्यावतीने समाजातील यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला. सामाजिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ७ ऑगस्टला नालासोपारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर यांच्यासह दहावी, बारावी व कला, क्रीडाक्षेत्रातील यशवंत विद्यार्थी समाजबांधवांना गौरविण्यात आले.
कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून गेली सहा दशके हा शैक्षणिक सोहळा होतो. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य आणि यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येते. सोहम गोठल या बालकाने आपल्या अमोघ वाणीतून सेवासंघाच्या इतिहासाचे सुवर्णक्षण उलगडून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर शैक्षणिक, कला, क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी समाजनेते भाई पोस्टुरे, रामराजे कॉलेजचे संस्थापक संदीप राजपुरे, कुणबी सेवासंघाचे अध्यक्ष मनोज घागरूम, दिनेश साखरे, निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले, ओबीसी संघर्ष समिती मंडणगड अध्यक्ष रघुनाथ पोस्टुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, कुणबी सेवासंघ महिलाध्यक्षा समिधा सापटे, सरचिटणीस विजय ऐनेकर, सुनील भागडे, सचिन माळी, पुष्पा बेर्डे, विजय मांडवकर, सुशील सकपाळ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85911 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..