''जल जीवन''च्या 80 योजनास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''जल जीवन''च्या 80 योजनास मान्यता
''जल जीवन''च्या 80 योजनास मान्यता

''जल जीवन''च्या 80 योजनास मान्यता

sakal_logo
By

''जल जीवन''च्या ८० योजनास मान्यता
के. मंजूलक्ष्मी ः वाडा गावासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या आजच्या बैठकीत प्रस्तावित ८० योजनांच्या ७० कोटी ४७ लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वाडा गावाच्या वैयक्तिक योजनेस समितीची शिफारस घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आजच्या बैठकीत दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, मजिप्रचे उपकार्यकारी अभियंता एम. आर. चिटणीस, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यू. आर. महाजनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर आदी उपस्थित होते.
श्री. सावर्डेकर यांनी सुरुवातीला सद्यस्थितीची माहिती दिली. एकूण ४३१ ग्रामपंचायती असून देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या १ लाख २५ हजार १११ इतकी आहे. २०२२-२३ च्या कृती आराखड्यानुसार ७३३ योजना आहेत. त्याची किंमत ३३०.६९ कोटी इतकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांवर झालेला खर्च ८.१० कोटी इतका असून कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या १८८ योजना आहेत. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनर्रचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणीपुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रगतीपथावर असणाऱ्या योजनांची कामे पूर्ण करून या मिशनअंतर्गत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी या वेळी केले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85918 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..