कुडाळात समरगीत स्पर्धेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात समरगीत स्पर्धेस प्रतिसाद
कुडाळात समरगीत स्पर्धेस प्रतिसाद

कुडाळात समरगीत स्पर्धेस प्रतिसाद

sakal_logo
By

L४२३१३
कुडाळ ः कुडाळ पंचायत समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित समरगीत स्पर्धेत गीत सादर करताना महिला. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात समरगीत स्पर्धेस प्रतिसाद

२४ संघांचा सहभाग; पंचायत समितीचा पुढाकार

कुडाळ, ता. १० ः येथील पंचायत समितीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळ्याचा दुसरा दिवस आज समरगीतांनी गाजला. यात २४ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्‍घाटन तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उपअभियंता (जलसंधारण) लक्ष्मण डुबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश कांबळे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी सखाराम चव्हाण, महादेव खरात, दत्ताराम आंबेरकर, रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, संजय चौकेकर, नंदकुमार धामापूरकर, रवी पोवार, पूजा पिंगुळकर, धोंडी रेडकर, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज सर्व कर्मचाऱ्यांनी पिवळा पोषाख परिधान केला होता.
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव ९ ते १७ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. उद्या (ता. ११) या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या विविध विभागांतर्गत देशभक्तिपर गीत स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ६ संघ, शिक्षण विभागाचे बिटनिहाय ६ संघ, एनआरएलएमचे प्रभागनिहाय ९ संघ, बालविकास प्रकल्प अधिकारी बिटनिहाय ८ संघ, पंचायत समिती अधिनस्त सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पशुसंवर्धन विभाग असे ३१ संघ असणार आहेत. उद्या निळा ड्रेस कोड असणार आहे. देशभक्तिपर स्पर्धेचे उद्‍घाटन सकाळी साडेदहाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे परीक्षण राजाराम गवाणकर, मोहन मेस्त्री यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85921 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..