कणकवली : शिवसेना मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : शिवसेना मेळावा
कणकवली : शिवसेना मेळावा

कणकवली : शिवसेना मेळावा

sakal_logo
By

42315
ओसरगाव : येथील सभेत बोलताना आमदार वैभव नाईक.

सत्तेसाठी भाजपकडून लोकशाहीची हत्‍या

वैभव नाईक : जिल्ह्यात राणेंविरोधात शिवसेनेची लढाई

कणकवली, ता.१०: सत्तेसाठी भाजप लोकशाहीची हत्या करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला आहे; मात्र भाजप सर्वसामान्यांचा आवाज दाबू शकत नाही. सत्तेमधून फेकून देण्याची ताकद सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे. सिंधुदुर्गात आपली लढाई ही राणेंविरूद्ध आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांत भाजप आणि राणेंविरोधात एकत्र या, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
ओसरगाव येथील कार्यक्रमात आमदार नाईक बोलत होते. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कळसुली मतदारसंघातील शिवसेनेची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी झाली. त्‍यानंतर जानवली विभागाची बैठक जानवली, सखलवाडी येथील सत्यवान राणे यांच्या घरी आणि कलमठ विभागाची बैठक विलास गुडेकर यांच्या घरी झाली.
शिवसेनेच्या ओसरगाव येथील बैठकीला उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, ॲड हर्षद गावडे, सुशांत दळवी, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, प्रमोद सावंत, रवी सावंत, सदा मोरे, निलेश सावंत, संतोष गुरव, उमेश गुरव, विलास सावंत, शिरीष घाडीगावकर, शरद सरंगले, पांडु कारेकर, उदय सावंत, महेश वारंग, उत्तम राणे, नंदू गावडे, सुभाष परब, सहदेव नाईक, विष्णू ठाकूर, विकास गुरव, नंदकिशोर परब, आदित्य मोरे, दशरथ शिंदे आदी उपस्थित होते.
--
शिवसेना कमकुवत करण्याचे षड्‍यंत्र
सतीश सावंत म्‍हणाले, शिवसेनेचे आमदार, खासदार फोडून शिवसेना कमकुवत करणे हे भाजपचे षड्‍यंत्र आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव आहे. या पापात शिंदे गट सहभागी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही एका कुटुंबाकडे आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बदल घडवून जिल्‍हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85923 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..