रत्नागिरी-पिकपाहणी नोंदीचा शेतकर्‍यांना अधिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पिकपाहणी नोंदीचा शेतकर्‍यांना अधिकार
रत्नागिरी-पिकपाहणी नोंदीचा शेतकर्‍यांना अधिकार

रत्नागिरी-पिकपाहणी नोंदीचा शेतकर्‍यांना अधिकार

sakal_logo
By

rat१०p१९.jpg-
रत्नागिरीः पटवर्धन हायस्कूलमधील मेळाव्याला उपस्थित शेतकरी.
-----------
पिकपाहणी नोंदीचा शेतकऱ्यांना अधिकार
तहसीलदार शशिकांत जाधव; सातबाऱ्यांवर अ‍ॅपद्वारे नोंद करा
रत्नागिरी, ता. १०ः आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या सातबाऱ्यावरील जमिनीत लागवड केलेल्या पिकाची पाहणी करण्याची शेतकऱ्यांना संधी दिली आहे. शासनाने ई-पीक पाहणी या नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याचा उपयोग शेतकरी आपल्या जमिनीतील पिकांची नोंदी सातबाराला करण्यासाठी करू शकतील. आपल्या जमिनीची पिकपाहणी नोंद करण्याचा आता शेतकऱ्यांना अधिकार आहे, असे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.
तालुक्यातील शेतकरी, आंबा बागायतदार यांना माहिती देण्यासाठी पटवर्धन हायस्कूल सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जाधव म्हणाले, शासनाने ही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील पिकाची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी अ‍ॅप डाऊनलोड करावे, त्यानंतर अ‍ॅप सुरू करून त्यात आपला मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी, त्यानंतर आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडावे आणि त्यानंतर आपला परिचय या पर्यायात आपली माहिती भरावी. त्यानंतर होमपेजवरील पिकाची माहिती या टॅबमध्ये आपले खाते क्रमांक टाकावा, त्यात जमिनीचे क्षेत्र, पोटखराबा क्षेत्र दिसेल, त्यानंतर आपल्या पिकानुसार खरीप, रब्बी व संपूर्ण वर्षे यापैकी एक हंगाम निवडावा, त्यानंतर शेतकर्‍यांनी लागवड केलेले पीक निवडावे आणि पिकाखालील क्षेत्र नमूद करावे, पिकास सिंचन करत असल्यास जलसिंचनाचे साधन निवडावे आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमधील जीपीएस लोकेशन सुरू करून आपल्या शेतातील पिकाचा फोटो घ्यावा व अपलोड करावा. सदरचा फोटो हा आपल्या शेतजमिनीपासून २०० मीटर आतमधीलच असला पाहिजे अन्यथा सदर पिकपाहणी त्रुटीत काढण्यात येते आणि २०० मी. किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरून फोटो घेतल्यास सदर पिकपाहणी मान्य होते. फोटो हा किती अंतरावरून घेतला आहे, याबाबत या अ‍ॅपमध्ये पिकाचा फोटो घेतल्यावर लगेच माहिती येते आणि सर्वात शेवटी ही पिकाची नोंदणी नोंदवण्याच्या बटणावर क्लिक केल्यावर नोंदणी पूर्ण होते.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी ई-पीक पाहणी करताना काही अडचणी आल्यास मंडल अधिकारी व तलाठी यांना संपर्क करण्याचे आवाहन केले. या शेतकरी मेळाव्याला निवडणूक नायब तहसीलदार कांबळे, महसूल सहाय्यक अमोल कांबळे, सुशील कोळंबेकर, परिमल डोर्लेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85924 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..