रत्नागिरी- विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या 2700 राख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या 2700 राख्या
रत्नागिरी- विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या 2700 राख्या

रत्नागिरी- विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या 2700 राख्या

sakal_logo
By

rat१०p२५.jpg
४२२९१
रत्नागिरीः मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्राने जवान, पोलिस व विशेष मुलांसाठी राख्या साकारल्या.
-------------
विद्यार्थी, दिव्यांगांनी
बनवल्या २७०० राख्या
मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स केंद्राचा पुढाकार
रत्नागिरी, ता. १० ः रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला अधिक घट्ट करणारा सण. याच नात्याची वीण घट्ट करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्यावतीने २७०० राख्या सीमेवरील जवान, पोलिस कर्मचारी आणि विशेष मुलांसाठी पाठवण्यात आल्या. या राख्या फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात आल्या.
रत्नागिरी आणि मासार (गुजरात) येथील फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र, येथी मुकुल माधव विद्यालय, विशेष मुलांचे कौशल्य विकास केंद्र, येरवडा येथील मनोरुग्णालयातील रुग्णांनी आणि थॅलेसेमियाग्रस्त तरुणांनी राख्या बनवण्याच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रेम, काळजी आणि चांगल्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना करत या राख्या आपल्या सीमेवरील भावांना पाठवण्यात आल्या. रत्नागिरी येथील तटरक्षक दल, पोलिस कर्मचारी, सियाचीनमधील जवान, औंध लष्कर केंद्रातील जवान, अपंग सैनिक कल्याण केंद्रातील जवान, रत्नागिरीतील रिमांड होम, उत्तर आणि पश्चिम भारताच्या सीमेवरील जवान, राजस्थानच्या सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या आहेत. गुजरातच्या पद्रा गावातील शाळा आणि मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थी राख्यांची देवाणघेवाण करणार आहेत.
या संदर्भात फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, "सीमेवर आपल्या संरक्षणासाठी तैनात भावांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी दरवर्षी फाउंडेशनकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठवल्या जातात. प्रेम, काळजी आणि प्रार्थनेसह ही राखी पाठवली आहे. औंध लष्कर केंद्रात सेलेब्रल पाल्सीग्रस्त, गतिमंद, थॅलेसेमिया ग्रस्त, अनाथ मुली आणि मुकुल माधव फाउंडेशनमधील महिला कर्मचारी राखी बांधून रक्षा बंधन साजरा करणार आहेत."

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85934 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..