पान तीन मेन-गणेशोत्सवासाठी सज्ज रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-गणेशोत्सवासाठी सज्ज रहा
पान तीन मेन-गणेशोत्सवासाठी सज्ज रहा

पान तीन मेन-गणेशोत्सवासाठी सज्ज रहा

sakal_logo
By

L४२३१९

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सव नियोजन बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अन्य अधिकारी.

गणेशोत्सवासाठी सज्ज रहा
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी ः पर्यावरणपूरक सणाचा आग्रह
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यातील आपल्या गावी येत असतात. या गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहील याची विशेष काळजी घ्यावी. नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केली.
गणेशोत्सव कालावधीत उपययोजना, बंदोबस्त व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणाची व्यवस्थित माहिती देण्यात यावी. कायदा व सूव्यवस्थेच्या दृष्टीने फिरती पोलिस पथकांचे नियोजन करावे. रहदारीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही, महामार्गावर वाहतुकीस अडथळा होणारी घटना घडल्यास क्रेन व जेसीबीची सोय करावी. महामार्गानजीकचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे खासगी रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक असावेत. गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे येणार आहेत. त्यासाठी परिवहन महामंडळाने तेथून गावी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. महावितरणने वीज व्यवस्था सुरळीत राहील यासाठी साधनसामग्री, मनुष्यबळ याची व्यवस्था करावी. गणेश मूर्ती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. सर्वच यंत्रणांनी समन्वयाने गणेशोत्सव उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत.’’ पोलिस अधीक्षक दाभाडे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवपूर्व २ दिवस आधी विशेषतः पोलिस महामार्ग सुरक्षा पोलिस, वाहतूक पोलिस यांनी दक्ष राहून वाहतुकीची कोंडी होणार नाही, याचे नियोजन करावे. रात्रीच्या वेळी वळणांवर घाट मार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत. कोणतेही अपघात होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात.’’
.........
रस्त्यावरील खड्डे भरून घ्या : उपजिल्हाधिकारी भडकवाड
निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी विशेषतः घाट मार्गांबाबत दक्ष राहून तत्काळ दुरुस्तीची कामे सुरू करावीत. रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. काही कारणास्तव गणेशभक्तांना घेऊन येणाऱ्या रेल्वे थांबल्यास त्यांच्या खाण्याची व पाण्याची सोय रेल्वे विभागाने करावी. महामार्गानजीकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक ठिकाणी आपत्कालीन सुविधा ठेवावी.’’
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85936 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..