नारळी पौर्णिमेनिमित्त आज मालवणात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारळी पौर्णिमेनिमित्त आज मालवणात विविध कार्यक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त आज मालवणात विविध कार्यक्रम

नारळी पौर्णिमेनिमित्त आज मालवणात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

नारळी पौर्णिमेनिमित्त आज
मालवणात विविध कार्यक्रम
मालवण, ता. १० ः येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण व्यापारी संघातर्फे उद्या (ता. ११) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुपारी तीनला श्री देव हनुमान मंदिरात सर्वकल्याणी साकडे, तीनला सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर श्री गणपती मुरलीधर देवालयात आगमन व साकडे घालण्यात येईल.
दुपारी साडेतीनला सवाद्य मिरवणुकीचे बंदर जेटी येथे आगमन, साडेतीनला व्यापारी संघाच्या अध्यक्षांच्या हस्ते मालवणवासीयांच्या मानाच्या प्रतिकात्मक सुवर्ण श्रीफळाचे व सागरराजाचे पूजन, पावणे चारनंतर किल्ले सिंधुदुर्ग येथील प्रथम मानाचा श्रीफळ अर्पण सोहळा व त्यानंतर मालवणवासीयांकडून अन्नदात्या रत्नाकराला श्रीफळ अर्पण कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चारला ‘आट्यापाट्या’ या मान्यताप्राप्त खेळाचा बॅ. नाथ पै सेवांगणच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनीय सामना होणार आहे. सायंकाळी पाचला निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्‍घाटन व सामने, साडेपाच ते साडेसहा दैवज्ञ भवन येथे व्यापारी बांधवांच्या गुणवंतांचा गुणगौरव, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी सभासदांचा सत्कार होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी चारला मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्लास्टिकमुक्ती अभियानाबाबत पालिकेच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85940 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..