रत्नागिरी- सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश
रत्नागिरी- सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

रत्नागिरी- सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

sakal_logo
By

rat१०p२८.jpg-
४२३२२
रत्नागिरी : सीए फाउंडेशन परीक्षेत यश मिळवणारे उज्ज्वला क्लासेसचे विद्यार्थी. पुढे बसलेले डावीकडून सीए दीपाली पाध्ये, पी. एम. पाध्ये आणि सीए शरदचंद्र वझे.
-----------
''पी. एम. पाध्ये''ज् ‘उज्ज्वला’चे
सीए फाउंडेशन परीक्षेत यश
रत्नागिरी, ता. १० : सीए इन्स्टिट्यूटतर्फे जून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत येथील प्रथितयश ''पी. एम. पाध्ये''ज् उज्ज्वला क्लासेसच्या ४५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. इयत्ता बारावीबरोबरच या विद्यार्थ्यांनी सीए करिअरची सुरवात केली.
सीए फाउंडेशन परीक्षा ४०० गुणांची होती. यामध्ये उज्ज्वला क्लासेसमध्ये प्रथम अक्षय चेऊलकर (३२०), द्वितीय सई खानोलकर (३१८) आणि तृतीय झोएब बांगी (३०८) यांनी सुयश मिळवले. या विद्यार्थ्यांचा सत्कार आज पी. एम. पाध्ये, सीए दीपाली पाध्ये, सीए शरदचंद्र वझे यांच्या हस्ते करण्यात आले. उज्ज्वला क्लासेसचे पुरुषोत्तम पाध्ये आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. कॉमर्स आणि सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सीएसारख्या परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन रत्नागिरीत मिळणे ही खूप चांगली गोष्ट आहे. या यशाबद्दल उज्ज्वला क्लासेसचे पुरुषोत्तम पाध्ये यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85948 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..