रत्नागिरी-पोलिस दलातर्फे स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रध्वजाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पोलिस दलातर्फे स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रध्वजाचे वाटप
रत्नागिरी-पोलिस दलातर्फे स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रध्वजाचे वाटप

रत्नागिरी-पोलिस दलातर्फे स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रध्वजाचे वाटप

sakal_logo
By

फोटो काल सोडला
...
-rat१०p२९.jpg
L42328
ः रत्नागिरी ः पोलिस दलातर्फे राष्ट्रध्वजाचे वाटप करताना पोलिस अधिकारी.
-------
पोलिस दलाच्या उपक्रमाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्‍ताने जिल्हा पोलिस दलातर्फे स्वातंत्र्य सैनिक आणि सेवानिवृत्‍त पोलिस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. देशाला दिलेल्या भरीव योगदानाचे ॠण व्यक्‍त करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेले स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्‍त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रध्वज वाटप केल्यामुळे स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्‍त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्‍त केली आहे.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85968 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..