बिबट्याची नखे, दात, बंदूक संशयिताकडून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याची नखे, दात, बंदूक संशयिताकडून जप्त
बिबट्याची नखे, दात, बंदूक संशयिताकडून जप्त

बिबट्याची नखे, दात, बंदूक संशयिताकडून जप्त

sakal_logo
By

42348
कणकवली ः पोलिसांनी आप्पा सावंत याच्याकडून जप्त केलेली बंदूक, बिबट्याची नखे.


बिबट्याची नखे, दात,
बंदूक सावंतकडून जप्त

नाटळ येथील शिकार, तस्करी प्रकरण

कणकवली,ता. १० ः नाटळ येथील जंगलमय भागात बिबट्याची बंदुकीने शिकार करून त्याचे कातडे तस्करी केल्या प्रकरणी आज संशयितांकडून बंदूक, बिबट्याची १४ नखे, दात व इतर साहित्य संशयितांकडून जप्त करण्यात आले. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस यंत्रणा गेली असून आतापर्यंत चौघांना अटक केली असून अजून दोघांच्या मागावर पोलिस आहेत.
अधिक माहिती अशी ः स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तळेरे येथे छापा टाकून बिबट्याचे कातडे तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली होती. सध्या पोलिसांच्या ताब्यात चौघे संशयित आहेत. त्यांना उद्या (ता. ११) येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. मंगेश सावंत, आप्पा सावंत, श्रीराम सावंत आणि संतोष मेस्त्री, अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आप्पा हरिश्चंद्र सावंत याच्याकडून एक बंदूक, बिबट्याची १४ नखे, दोन दात, एक बॅटरी जप्त करण्यात आली. तसेच संशयित मंगेश सावंतकडून दोन चाकू, कोयता, फावडे, कुदळ आणि बॅटरी जप्त केली. संशयित आप्पाने दोन वर्षांपूर्वी बिबट्याची शिकार केल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचे कातडे श्रीराम सावंत आणि संतोष मेस्त्री यांच्या माध्यमातून मुख्य संशयित राजेंद्र पारकर याच्यापर्यंत पोहोचले होते. ज्या परिसरात शिकार झाली होती. त्या परिसराचाही पंचनामा पोलिसांनी केला. ज्या परिसारत बिबट्याचे उर्वरित अवशेष गाडले होते, तेथेही पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणात अन्य संशयितांचाही समावेश असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी आज दिली. उपनिरीक्षक वृषाली बरगे, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85993 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..