चिपळूण ः चिपळूण शिवसेनेत नेतृत्वावरून वाढली धुसफूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूण शिवसेनेत नेतृत्वावरून वाढली धुसफूस
चिपळूण ः चिपळूण शिवसेनेत नेतृत्वावरून वाढली धुसफूस

चिपळूण ः चिपळूण शिवसेनेत नेतृत्वावरून वाढली धुसफूस

sakal_logo
By

चिपळूण शिवसेनेत नेतृत्वावरून वाढती धुसफूस
भास्कर जाधव टार्गेटवर; पालिकेच्या २८ जागा जिंकण्याची चव्हाणांकडून हमी
चिपळूण, ता. १०ः माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी समर्थकांचा मेळावा घेत पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. शिवसेनेत आपले राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली असून त्यापासून धोका आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आमदार भास्कर जाधव यांना अप्रत्यक्षरित्या टार्गेट करण्यात आले. त्यांच्या या भूमिकेनंतर समर्थकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून शिवसेनेच्या अंतर्गत गोटात जोरदार धुसफूस सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शिवसेनेत अंतर्गत घडामोडी वाढल्या आहेत. या निमित्ताने पक्षांतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञतेसाठी उभारलेल्या फलकावरून वाद घडले. या घटनेनंतर सकपाळ यांनीही नाराजी व्यक्त करताना शहरातील कारभारात काहीजण जाणीवपूर्वक लुडबूड करत असल्याची खंत व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर शहरात पक्षाची बसलेली घडी विस्कटण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात पक्षाची एकहाती सत्ता हवी असेल तर आमच्यावर जबाबदारी द्या. सर्व २८ जागा निवडून येतील याची हमी देतो, असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्त्यव्याने शिवसेनेची शहर कार्यकारिणी पक्षांतर्गत राजकारणामुळे घायाळ झाल्याचे उघड झाले आहे.
माजी आमदार चव्हाण यांनी देखील मंगळवारच्या बैठकीत आपली वेगळी भूमिका स्पष्ट करताना आमदार भास्कर जाधव यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. गेल्या १८ वर्षात तालुक्यात शिवसैनिकांनी जिवाचे रान करून काम केल्याने संघटना मजबूतपणे उभी राहिली; मात्र आता त्याच पक्षात आपले अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावीच लागेल, असा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याचा प्रभाव प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पडला.

चौकट
खासदारांचा थेट खुलासा नाही
नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेतच नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाल्याने कार्यकर्तेही गोंधळले आहेत. आता या निवडणुकीची सुत्रे कोणाकडे राहणार इथपासूनचे प्रश्न इच्छुकांसमोर आहेत. माजी आमदार चव्हाण यांनी या निवडणुकीचे नेतृत्व आपणच करणार, अशी भूमिका घेतली. त्याचबरोबर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनीही खासदारांची भेट घेत माजी आमदार चव्हाणांकडे नेतृत्व देण्याची मागणी केली. त्यावर खासदारांनी थेट खुलासा केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात गोंधळ आणखीनच वाढला आहे. त्यातच आता निवडणुकीतील नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना पक्ष कोणता निर्णय घेतो, याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86005 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..