टेंबवलीत दोन किलो गांजा घरातून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंबवलीत दोन किलो गांजा घरातून जप्त
टेंबवलीत दोन किलो गांजा घरातून जप्त

टेंबवलीत दोन किलो गांजा घरातून जप्त

sakal_logo
By

42369
टेंबवली ः स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कालवी येथून गांजासह संशयितास ताब्यात घेतले.

टेंबवलीत दोन किलो
गांजा घरातून जप्त
संशयित ताब्यात; स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः तालुक्यातील टेंबवली-कालवी परिसरात छापा टाकून सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला. ओरोस येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज दुपारी दीडच्या दरम्यान छापा टाकला. यामध्ये संशयित संतोष भास्कर पारकर (वय ५६) वर कारवाई करण्यात आली. तेथून सुमारे दोन किलो १५८ ग्रॅम गांजासह अन्य साहित्य जप्त केले. येथील पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिलेली माहिती अशी ः कालवी परिसरात एका घरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार दुपारी तेथे छापा टाकला. घरात दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये गांजा आढळला. एका पिशवीत एक किलो ५७६ ग्रॅम, तर दुसऱ्‍या पिशवीत सुमारे ५८२ ग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत सुमारे ६३ हजार आहे. पोलिसांनी वजनकाट्यासह अन्य साहित्यही जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार पी. एस. कदम, के. ए. केसरकर, ए. ए. गंगावणे, संकेत खाडये, ए. एस. तेली, आर. एम. इंगळे आदींनी कारवाई केली. उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86024 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..