मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा
मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

sakal_logo
By

42371
हुस्नबानू खलिपे

मालवणात महिलांसाठी
नारळ लढविणे स्पर्धा
आज आयोजन; पैठणीसह सोन्या-चांदीची बक्षिसे

मालवण, ता. १० ः येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या वतीने उद्या (ता. ११) सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्याची नथ आणि पैठणी दिली जाणार असून, विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या स्पर्धकास ९ ग्रॅम सोन्याचा हार मिळणार आहे. याशिवाय अन्य विजेत्यांना चांदीचा हार, कंबरपट्टा, मोबाईल अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून काँग्रेस नेत्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली.
संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. विशेष प्राविण्य म्हणून आकर्षक ९ ग्रॅम सोन्याचा हार, त्याशिवाय स्पर्धेमधील प्रथम क्रमांकांस पैठणी, सोन्याची नथ व सोबत १० लाखाचा विमा, द्वितीय क्रमांकास पैठणी व चांदीची पैंजणीसह १० लाखाचा विमा, तृतीय क्रमांकासाठी पैठणी व चांदीची पैजणीसोबत १० लाखाचा विमा, चतुर्थ क्रमांकासाठी पैठणी, मोबाईलसह १० लाखाचा विमा अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागाबद्दल लकी ड्रॉद्वारे हक्काचे बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा ठेवण्यात आला आहे. स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून मोफत मिळणार आहेत. स्पर्धक व स्पर्धा पाहणाऱ्या नागरिकांसाठी कुपन देण्यात येणार असून, यातून एक कुपन लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल. विजेत्यास आकर्षक बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी आमदार खलिपे यांनी शहरात जुनी भरड शाळा येथे शिक्षण घेतले आहे. याच शहरात त्यांचे बालपण गेले असून आज पुन्हा या शहरात त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86026 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..