कणकवली : दूरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : दूरावस्था
कणकवली : दूरावस्था

कणकवली : दूरावस्था

sakal_logo
By

L४२४१५
कासार्डे ः गावातील बंडवाडीतील गणेशमुर्ती विसर्जन स्‍थळाची झालेली दूरावस्था

कासार्डे गणेशमुर्ती विसर्जन स्‍थळाची दूरावस्था
कणकवली,ता. ११ ः तालुक्‍यातील कासार्डे गावातील बंडवाडीतील गणपती विसर्जन स्‍थळाची दूरावस्था झाली आहे. गव्‍हाळी जवळील जाभ्या दगडाचा चौथरा पूर्णपणे खचला असून चौथऱ्यावर तसेच आजुबाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. व्‍हाळाकडे जाणाऱ्या पायऱ्याही निसरडया झाल्‍या आहेत. येथे तर्फेवाडीतील सर्व ग्रामस्थाच्‍या घरगुती गणपती मुर्तीचे विसर्जन करतात.या परिसराची सापसफाई करावी,अशी मागणी कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाने केली आहे.

कासार्डे गावातीत बंडवाडीतील दीड, पाच,दहा दिवशीचे गणपतीच्या मुर्ती तेथील चौथऱ्यावर ठेवून पूजा अर्चाकरूनच मगच व्‍हाळावर विसर्जनासाठी नेत असतात. गेल्‍या तीन वर्षापासून या परिसराची दुरवस्था झाली आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठया प्रमाणात झाडेझुडपे व रान सुध्धा वाढले आहे. व्‍हाळावर वरून खाली जाण्यासाठी पायवाटेवरील ज्‍या पायऱ्या आहेत. त्‍यासुध्‍दा झीजल्‍यामुळे निसरड्या झाल्या आहेत. त्‍यामुळे गणेशमुर्ती हातात किंवा डोक्‍यावर घेउन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. त्‍यामुळे येथे येणाऱ्या बंडवाडीतील प्रत्‍येक भक्‍तगणांची गैरसोय निर्माण झाली आहे. येथील असुविधेबददल पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे सचिव दिनेश सहदेव तर्फे यांनी नुकतेच मंडळाच्‍या वतीने कासार्डे ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक गजानन कोलते यांच्‍याकडे तसेच शासनाच्‍या आपले सरकर संकेतस्‍थळावर जिल्‍हा परिषदेकडे निवेदन देउन तक्रारही दाखल केली आहे. या परिसराची सापसफाई करून येथे नव्‍याने व्‍हाळाजवळ सुविधा लवकरात लवकर गणपती विसर्जनापूर्वी निर्माण कराव्‍यात अशी मागणी मंडळाच्‍या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86136 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..