कणकवली : वीज चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : वीज चोरी
कणकवली : वीज चोरी

कणकवली : वीज चोरी

sakal_logo
By

वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणची करडी नजर
तीन महिन्यात १३१ कोटींच्या चोऱ्या उघडकीस
कणकवली,ता.११ : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाखांच्या २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.

याबाबात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सिंघल म्हणाले की, वीजचोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीजचोरीस लगाम घालावा, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी प्रभारी संचालक सेवानिवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर उपस्थित होते.
सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत-२२, पुणे प्रादेशिक कार्यालय-१४, नागपूर प्रादेशिक कार्यालय- १५ तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात - १२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर-२०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या २० भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास २० प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
२०१९-२० या आर्थिक वर्षात ९२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७१६९ एवढ्या वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३ हजार ३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी एवढी आहे.
वीजचोरीच्या एकूण अनुमानित रक्कमेपैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात ५४.३६ कोटी, २०२०-२१ या वर्षात ५३.१८ कोटी तर २०२१-२२ या वर्षात १२४.९८ कोटी रुपयांची अनुमानित रक्कमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86137 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..