संवेदनशील गाव अधिसूचनेबाबत कळणेत 14 ला बैठकीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवेदनशील गाव अधिसूचनेबाबत
कळणेत 14 ला बैठकीचे आयोजन
संवेदनशील गाव अधिसूचनेबाबत कळणेत 14 ला बैठकीचे आयोजन

संवेदनशील गाव अधिसूचनेबाबत कळणेत 14 ला बैठकीचे आयोजन

sakal_logo
By

संवेदनशील गाव अधिसूचनेबाबत
कळणेत रविवारी बैठकीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ११ ः केंद्राच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने ६ जुलैला पाचव्यांदा प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसूचनेसंदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी पर्यावरणप्रेमींच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ''घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'' या सेवाभावी संस्थेने कळणे ग्रामस्थांच्या सहकार्याने ही बैठक १४ ला दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये आयोजित केली आहे.
''घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'' या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील एकाही गावाचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (Ecologically Sensitive Area - ESA) म्हणून झालेला नाही. संपूर्ण दोडामार्ग तालुका यातून वगळण्यात आला आहे. दोडामार्ग तालुका हा जैवविविधता व पर्यावरणदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे; परंतु या भागात खाणकाम, तसेच डोंगरदऱ्यांमध्ये जंगलतोड करुन रबर, अननस वगैरे एकाच प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. यामुळे या भागातील जैवविविधता, प्राण्यांचा अधिवास आणि एकंदरच पर्यावरण धोक्यात आले आहे. हे जपण्यासाठी हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर होणे आवश्यक आहे. अन्यथा हा संपूर्ण भाग खाणमाफियांना आंदण दिल्यासारखे होईल. यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86148 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..