फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L४२४३२
बांदा ः केंद्रशाळा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता मोहिमेस
बांद्यात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतून करण्यात आली. यावेळी शाळा, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे या परिसराची स्वच्छता करण्यात आली. बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून स्वच्छतेसंबंधी घोषणा देत प्रभातफेरी काढली. या अभियानात बांदा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच सफाई कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, तरुण मंडळे, महिला मंडळ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
.............

L42434
ओळ - सावंतवाडी ः तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

धान्य पुरवठ्याबाबत
तहसीलदारांना निवेदन
बांदा ः भारतीय जनता पार्टी बांदातर्फे सावंतवाडी तहसीलदारांना भेटून कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण गणेश चतुर्थीच्यावेळी लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेशनिंग दुकानावरील धान्यसाठा किमान दहा दिवस अगोदर रेशनधारकांना उपलब्ध करावा. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या धान्य व तेलाच्या वाटप प्रमाणात थोडी वाढ करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले. रेशनिंग दुकानावरील धान्यसाठा आवश्यकतेनुसार उपलब्ध असावा. त्याबाबत धान्यपुरवठा विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी बांदा सहअध्यक्ष बाबा काणेकर, केदार कणबर्गी, नीलेश सावंत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
...............

L42435
ओळ - बांदा ः कार्यक्रमात बोलताना पोलिस निरीक्षक शामराव काळे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

माजी सैनिकांचा
बांद्यात सत्कार
बांदा ः स्वातंत्रसैनिक व माजी सैनिकांचे देशासाठी असलेले योगदान अनमोल आहे. कित्येक जवानांनी आपल्या देशासाठी दिलेले बलिदान देखील न विसरता येण्यासारखे आहे. बांदा ग्रामपंचायतीने माजी सौनिक व त्यांच्या कुटुंबियांचा केलेला सत्कार समाजासाठी प्रेरक आहे, असे गौरवोद्गार बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे काढले.
स्वातंत्र्याचा मृतमहोत्सवानिमित्त बांदा ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक व व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सरपंच अक्रम खान, ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक एस. आर. सावंत, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, साई काणेकर, शामसुंदर मांजरेकर, जावेद खतीब, राजेश विरनोडकर, रिया आल्मेडा, किशोरी बांदेकर, स्वप्नाली बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक संघाने केले होते. प्रास्ताविक अन्वर खान यांनी केले. आभार बाळू सावंत यांनी मानले.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86149 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..