कणकवली : कातकरी प्रश्‍न बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : कातकरी प्रश्‍न बैठक
कणकवली : कातकरी प्रश्‍न बैठक

कणकवली : कातकरी प्रश्‍न बैठक

sakal_logo
By

L42440
कणकवली : येथील पंचायत समिती कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आदिवासी कातकरी संघटनेचे नेते सुदीप कांबळे यांच्याशी चर्चा केली.

कातकरी बांधवांना घरपत्रक उतारे देणार
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्‍वाही : आदिवासी-कातकरी १४ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम


कणकवली, ता.११ : आदिवासी कातकरी यांना १३ ऑगस्ट पर्यंत घरपत्रक उतारे देण्यात येतील अशी ग्‍वाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज दिली. मात्र कातकरी बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्‍यामुळे १४ ऑगस्टला धरणे आंदोलन होणारच असा निर्धार आदिवासी कातकरी संघटनेचे सुदीप कांबळे यांनी व्यक्‍त केला.
आदिवासी-कातकऱ्यांच्या प्रश्‍नावर १४ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कातकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. याची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन आदिवासी कातकरी संघर्ष समितीचे नेते सुदीप कांबळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्यासह विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद पालकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, कक्ष अधीक्षक मनीषा देसाई, फोंडाघाट ग्रामविकास अधिकारी विलास कोलते आदी उपस्थित होते.
पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्या दालनात जिल्‍हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आदिवासी कातकरी संघटनेचे ॲड. सुदीप कांबळे, सुनील पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी फोंडाघाट येथील सर्व आदिवासी कातकरी समाजबांधवांची १३ ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायत दफ्तरी नोंद घालून घरपत्रक उतारा दिले जातील अशी ग्‍वाही दिली.
सुदीप कांबळे यांनी फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी समाज वस्तीतील प्रलंबित मुलभूत प्रश्न प्रशासनासमोर मांडले. कातकरी वस्तीचा पाणी प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. तसेच वीज जोडणी बाबतची सर्व कागदपत्रे पूर्ण केली तरी गेल्‍या चार महिन्यात वीज जोडणी नसल्‍याचे स्पष्‍ट केले. त्‍यामुळे १४ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे ते म्‍हणाले.
यानंतर उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.पराडकर यांनी कातकरी वस्तीमधील झोपडीवजा घरांना घरपत्रक उतारा देण्याचे आदेश दिले. तर १५ ऑगस्ट पूर्वी फोंडाघाट येथील कातकरी वस्तीत वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ पोळ यांना कातकरी वस्तीत जाऊन तेथील आरोग्य तपासणी करुन कुपोषित बालकांना पोषण आहार देण्याच्या सूचना दिल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी किशोर गवस याना केंद्रप्रमुखांमार्फत कातकरी वस्तीतील शाळाबाह्य विद्यार्थ्याना शिक्षण मिळण्यासाठी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86154 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..