कुडाळ हायस्कूलने राबवला ''ज्ञानयज्ञ-मदतीचा हात'' उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ हायस्कूलने राबवला
''ज्ञानयज्ञ-मदतीचा हात'' उपक्रम
कुडाळ हायस्कूलने राबवला ''ज्ञानयज्ञ-मदतीचा हात'' उपक्रम

कुडाळ हायस्कूलने राबवला ''ज्ञानयज्ञ-मदतीचा हात'' उपक्रम

sakal_logo
By

L४२४४६

कुडाळ ः ''ज्ञानयज्ञ-एक मदतीचा'' उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना का. आ. सामंत, बाजूला सौ. शालिनी शेवळे. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ हायस्कूलने राबवला
''ज्ञानयज्ञ-मदतीचा हात'' उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः शिक्षण जीवनाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणारे असल्यास ते चिरंतन साथ देते. अशाच आशयाचा सामाजिक बांधिलकी जपणारा ''ज्ञानयज्ञ-एक मदतीचा हात'' हा उपक्रम कुडाळ हायस्कूलच्या नववीच्या मुलांनी राबविला. यात गरजू मुलांना आपल्याकडील शैक्षणिक साहित्यातून मदतीचा हात दिला. याचे वितरण माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, माजी मुख्याध्यापिका सौ. शालिनी शेवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यातील समाजऋण जपणारा ''ज्ञानयज्ञ'' हा एक उपक्रम होय. गरजू मुलांच्या जीवनात ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्यासाठी काय करता येईल? या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला. नववीच्या मुलांनी त्यांच्याकडे जादा असलेल्या शैक्षणिक वस्तू वर्गात आणल्या. यामध्ये वह्या, पेन्स, पेन्सिल, रंगसाहित्य, गोष्टीची पुस्तके, पट्टी वगैरे वस्तूंचा समावेश होता. या वस्तूंचे २१ गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. याचे व्यवस्थापन नववीच्या ''इ'' च्या मुलांनी केले. परिस कुबल याने मान्यवरांचे स्वागत केले. मृणाल सावंत हिने सूत्रसंचालन तर सौमित्र मुंडले याने आभार व्यक्त केले. उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन सुरेंद्र गोसावी यांचे होते. मंदार देऊसकर, निखिल ओरोसकर, एकनाथ जाधव यांचे यासाठी सहकार्य लाभले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86157 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..