साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

डी-कॅड मध्ये
चित्रप्रदर्शन
साडवली ः देवरूख येथील डी-कॅड कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याची गाथा सांगणारी चित्रे रेखाटली आहेत. आर्ट गॅलरीत या चित्रांचे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी १० ते संध्या. ५ अशी वेळ असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डिन, कला संचालक विश्वनाथ साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थाध्यक्ष अजय पित्रे, ट्रस्टी भारती पित्रे, प्राचार्य रणजित मराठे आदी उपस्थित होते. नागरिकांनी चित्रप्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे डी-कॅडने आवाहन केले आहे.
----------
सहकारी संस्थांचे
प्रशिक्षण शिबिर
दाभोळ ः देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दापोली तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे संचालक, कर्मचारी, सहकारातील कार्यकर्ते यांच्यासाठी शुक्रवारी (ता. १२) सकाळी १०.३० वा. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातील सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सोपान शिंदे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) तृप्ती उपाध्ये, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर उपस्थित राहणार आहेत.
-------------
दापोली अर्बनमध्ये
स्वच्छता कार्यक्रम
दाभोळ ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वराज्य महोत्सवांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमामध्ये एनएसएस उपक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे आणि प्रा. अजिंक्य मुलुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एनएसएस सदस्य आणि स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम समन्वयक प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि आयोजन समन्वयक प्रा. संतोष मराठे यांच्या प्रोत्साहनाने एनएसएस अधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86172 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..