चिपळूण-पुढाकार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांची शिवसेनेला गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-पुढाकार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांची शिवसेनेला गरज
चिपळूण-पुढाकार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांची शिवसेनेला गरज

चिपळूण-पुढाकार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांची शिवसेनेला गरज

sakal_logo
By

rat11p14.jpg-
42462
माजी आमदार सदानंद चव्हाण
------------

चिपळूण शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर--लोगो

शिवसेनेला नेतृत्व करणाऱ्यांची गरज
चिपळुणातही नेतृत्वाची लढाई; सध्या दिवस इशाऱ्यांचे
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीने हायजॅक केलेली चिपळूणची शिवसेना पुन्हा जाग्यावर आणण्याची संधी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासमोर आहे; मात्र सेनेला राज्यस्तरावर ग्रहण लागल्यानंतर माजी आमदार चव्हाण यांच्यातील स्वाभिमान जागा झाला आहे. गेली अडीच वर्षे आपल्याला डावलले जात आहे. आपले अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न शिवसेनेत होत असल्याचे सांगत त्यांनी वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेतील सध्याचे चित्र पाहता नेतृत्व मागण्याऐवजी स्वतःहून पुढाकार घेत नेतृत्व करणाऱ्यांची शिवसेनेला खरी गरज आहे.
आगामी निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली होतील. मी कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा इशारा चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत राज्यस्तरावर सुरू असलेली नेतृत्वाची लढाई चिपळूणपर्यंत येऊन ठेपली आहे. सदानंद चव्हाण यांच्या मनात नेमकी कोणती घालमेल सुरू आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना पक्षात घेताना शिवसेनेने मंत्रिपदाचे शब्द दिले होते; परंतु मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले. चिपळुणातील संघटनेतही त्यांचा हस्तक्षेप होऊ नये याची व्यवस्था करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सदानंद चव्हाण शांत झाले. पक्षाकडून त्यांना फारसे बळ दिले गेले नाही. त्यामुळे शिवसेनेत मरगळ आली. ती संधी आमदार शेखर निकम यांनी साधली. शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आपलेसे करण्यात निकमांना यश आले. मात्र सदानंद चव्हाण यांना विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यांनी सुचवलेल्या कामांना सरकारकडून निधीची तरतूद झाली नाही. याबद्दल त्या त्या वेळी एका शब्दातही त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही.

चौकट
महाविकास आघाडीचे कारण मिळाले
कोरोना आणि पूरपरिस्थितीच्या काळात आमदार निकम यांनी शहर आणि ग्रामीण भागात छाप पाडली. अडीच वर्षात ३०० कोटीचा निधी मिळवला. पूरपरिस्थितीनंतर आमदार निकम यांनी सुचवलेली कामे शासनाकडून मंजूर झाली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कल राष्ट्रवादी पर्यायाने शेखर निकम यांच्याकडे होता. महाविकास आघाडीचे कारण देत शिवसेनेचे पदाधिकारी आमदार निकम यांच्याभोवती फिरताना आढळत होते. जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदारांचे कौतुक केले जात होते. त्यामुळे माजी आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

चौकट
आक्रमकता संघटनेसाठी की स्वस्तःसाठी
मागील अडीच वर्षात संघटना वाढीच्यादृष्टीने शिवसेनेच्या तालुक्यात फारशा बैठका झाल्या नाही. ज्या झाल्या त्यात सदानंद चव्हाण यांची उपस्थिती होती; मात्र आता शिवसेनेला नेत्यांची गरज असताना मागील अडीच वर्ष सक्रिय नसलेले चव्हाण आक्रमक झाले आहेत. त्यांची ही आक्रमकता संघटनेसाठी की स्वतःसाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

कोट
शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम चालते. पक्षाचे सर्व निर्णय मातोश्रीवरून होतात. त्यामुळे चिपळुणातील नेतृत्वाच्या लढाईला काहीच अर्थ नाही. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येकाला योग्यवेळी योग्य अन्याय देतात. कुणावरही अन्याय करत नाही.
- विनायक राऊत, खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86173 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..