टुडे पान एक अँकर-वन्यप्राणी रोखण्यासाठी कुंपण उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक अँकर-वन्यप्राणी रोखण्यासाठी कुंपण उभारा
टुडे पान एक अँकर-वन्यप्राणी रोखण्यासाठी कुंपण उभारा

टुडे पान एक अँकर-वन्यप्राणी रोखण्यासाठी कुंपण उभारा

sakal_logo
By

टीपः swt११२२.jpg KOP२२L४२४९४
सावंतवाडी ः वनक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर यांना निवेदन देताना बापू सावंत व ग्रामस्थ.

वन्यप्राणी रोखण्यासाठी कुंपण उभारा
माजगाव ग्रामस्थ ः वनविभागाकडे केली मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः माजगाव-चिपटेवाडी येथील भात पिकांची वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी लक्षात घेता खाजगी आणि वन जमिनीमध्ये बुरुज लाईनला तारेचे कंपाउंड उभारा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्यासह सरपंच दिनेश सावंत व ग्रामस्थांनी सावंतवाडी वनक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्याजवळ निवेदनाव्दारे केली आहे.
सावंतवाडी तालुक्यात सध्या वन्यजीवांकडून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. माजगाव-चिपटेवाडी येथे असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वन्य प्राण्यांकडून नजीकच्या भात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी सुरू आहे. या ठिकाणी असलेले पूर्वीचे तारेचे कंपाउंड नष्ट झाल्यामुळे वन्य प्राणी भात शेतात सहज येतात. गेले कित्येक वर्ष हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून या ठिकाणी तारेच्या कुंपणाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही मागणी लक्षात घेता आज माजी पंचायत समिती सदस्य सावंत, सरपंच सावंत यांच्यासह ग्रामस्थ सदाशिव गावडे, शिवराम वराडकर, सुनील वराडकर, वैभव चौगुले, दत्ताराम वराडकर, भरत गावडे यांनी सावंतवाडी वनक्षेत्र अधिकारी क्षीरसागर यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी तेथील समस्या सांगून श्री. शिरसागर यांचे लक्ष वेधले. यावेळी श्री. क्षीरसागर यांनी, ''आवश्यक असलेल्या निधीबाबत लवकरच जिल्हा नियोजनकडे मागणी करण्यात येणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तांत्रिक मंजुरी घेऊन हे कुंपण उभारण्यात येईल'', असे सांगितले. ग्रामस्थांनी लवकरात लवकर याबाबत जिल्हा नियोजनकडे पाठपुरावा करून तारेचे कुंपण उभारण्याबाबत पुढाकार घ्या, असे सांगितले.
-------------
चौकट
पंचनामे युध्दपातळीवर
शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता आवश्यक असलेले पंचनामेही वने विभागाकडून सुरू आहेत. संबंधित वन कर्मचाऱ्यांना यावर्षी कल्पना दिल्या असून ते नुकसानीचे पंचनामे करतील, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86196 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..