फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L42472

ओळ - मुणगे ः येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडी सहभागी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आदी.

अमृत महोत्सवानिमित्त
मुणगे येथे वृक्षदिंडी
मुणगे ः येथील श्री भगवती हायस्कुल आणि (कै.) वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. भगवती हायस्कूल ते भगवती हायस्कूल तिठ्यापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. रक्षाबंधननिमित्त मुणगे हायस्कूल तिठा येथील वडाच्या झाडास राखी बांधून वृक्ष संवर्धन संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती मोनिका कुंज, देवस्थान विश्वस्त कृष्णा ऊर्फ दादा सावंत, शिक्षिका सौ. गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, सौ. रश्मी कुमठेकर, ज्युनिअर कॉलेजचे प्रा. झुंझार पेडणेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ. मिताली हिर्लेकर, सौ. प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर, एन. एल. बागवे, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, संतोष मुणगेकर, ग्रामस्थ राजू पुजारे, सुनिल पुजारे, रामू नाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेत विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रक्षाबंधनआणि नारळी पौर्णिमा या सणाचे महत्व मान्यवरानी विध्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचलन सौ. तवटे तर आभार सौ. कुमठेकर यांनी मानले.
------------------
L42473

ओळ - फणसगाव ः महाविद्यालय आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी एनएसएसचे विद्यार्थी व प्राचार्या. (छायाचित्र ः एन. पावसकर)

उंडील तिठा परिसरात स्वच्छता
तळेरेः देवगड तालुक्यातील फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
फणसगाव कॅन्टीन आणि उंडील तिठा परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा उपक्रम ग्रामपंचायत विठ्ठलादेवीच्या सहयोगाने आणि महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाद्वारे आयोजित करण्यात आला. यावेळी एनएसएसचे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. अनुश्री नारकर, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. जान्हवी नारकर आणि प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा. आशिष ढेकणे आणि इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86201 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..