फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

swt११२८.jpg-KOP२२L४२५११.
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा मुख्यालय परिसरात स्वच्छता करताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. सोबत इतर अधिकारी.

जिल्हा मुख्यालय
परिसरात स्वच्छता
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासकीय संकुल परिसरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता थोरात यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही आजच्या या स्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील प्लास्टिक, इतर कचरा स्वच्छ केला. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्रास कटरच्या सहाय्याने वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला.
----------
कुडाळात आज
मार्गदर्शन मेळावा
कुडाळ, ता. ११ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने उद्या (ता. १२) महालक्ष्मी हॉल येथे दुपारी ३ वाजता शहरातील महिला बचतगट स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महिला बचतगटांना बँकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याबाबत मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात बँक ऑफ इंडिया कुडाळ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुडाळ यांच्या प्रतिनिधीमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बचतगटामार्फत उत्पादित केल्या जाणाऱ्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीमार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्व महिला बचतगटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86221 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..