पणदूर-सिध्दवाडी येथे खवले मांजरास जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणदूर-सिध्दवाडी येथे 
खवले मांजरास जीवदान
पणदूर-सिध्दवाडी येथे खवले मांजरास जीवदान

पणदूर-सिध्दवाडी येथे खवले मांजरास जीवदान

sakal_logo
By

L42515
टीपः swt११३०.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - पणदूर ः सिद्धवाडी येथे घरानजीक लावलेल्या जाळ्यामध्ये खवले मांजर अडकले.

पणदूर-सिध्दवाडी येथे
खवले मांजरास जीवदान
कुडाळ, ता. ११ ः पणदूर-सिद्धवाडी येथील मदन शिरोडकर यांच्या घरानजीक संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये एक वयस्कर नर जातीचे खवले मांजर अडकले. या खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात सोडले.
घरानजीक संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे शिरोडकर यांच्या लक्षात आले. त्यांनी सरपंच दादा साईल यांना माहिती दिली. साईल यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत खवले मांजराला सुरक्षितरित्या जाळ्यातून बाहेर काढले. वन विभागाच्या सल्ल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून घेत नैसर्गिक अधिवासात सोडले.
खवले मांजराला बघण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. खवले मांजर हा अतिशय दुर्मिळ असणारा प्राणी आहे. याच्या खवल्यांचा औषधी उपयोग असल्याने त्याची मोठी तस्करी होते. त्यामुळे या प्राण्याला वाचविण्यासाठी वनविभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. जाळ्यात सापडलेल्या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सरपंच साईल यांच्यासह ग्रामस्थ शिरोडकर गुरुजी, चंद्रकांत साईल, पोलिस पाटील देऊ सावंत, नागेश कुबल, राकेश सावंत, विनायक साईल यांनी मदत केली. वनविभागाचे अधिकारी पिळणकर, सिद्धार्थ शिंदे, नकाशे आदी उपस्थित होते..
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86228 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..