टुडे पान एक-125 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-125 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य
टुडे पान एक-125 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य

टुडे पान एक-125 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य

sakal_logo
By

१२५ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य
जिल्हा आरोग्य अधिकारी ः साडे अठरा लाख निधी खर्च
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसहाय्य देणे योजनेचा गतवर्षी जिल्ह्यातील १२५ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. यासाठी १८ लाख ४३ हजार ७९५ रूपये निधी खर्च करण्यात आला आहे. २०२२-२३ साठी २० लाख निधीची तरतूद असून या योजनेचा जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्ण यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत कॅन्सर, हृदयरोग, किडनी रोग यांसारख्या दुर्धर आजारी रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबविण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांचे १२५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या सर्व प्रस्तावांना मंजूरी देऊन त्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला १५ हजार पर्यंत लाभ देण्याची मर्यादा आहे. गतवर्षी जिल्ह्यातील दुर्धर आजारी असलेल्या १२५ लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला असून त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १५, कुडाळ १३, दोडामार्ग १०, मालवण ३०, वेंगुर्ले १५, सावंतवाडी २२, वैभववाडी ११ तर देवगड तालुक्यातील ९ दुर्धर आजारी रुग्णांचा समावेश आहे. या योजनेसाठी २०२२-२३ साठी २० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी दुर्धर आजारी रूग्ण यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकड़े आपले प्रस्ताव सादर करावेत तसेच प्रस्तावासोबत आजाराबाबतचे कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन डॉ. खलीपे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86231 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..