खेड ः कोंडीवली बौद्धवाडी स्मशानभूमी अतिक्रमणाबाबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः कोंडीवली बौद्धवाडी स्मशानभूमी अतिक्रमणाबाबत
खेड ः कोंडीवली बौद्धवाडी स्मशानभूमी अतिक्रमणाबाबत

खेड ः कोंडीवली बौद्धवाडी स्मशानभूमी अतिक्रमणाबाबत

sakal_logo
By

कोंडीवली-बौद्धवाडीतील
स्मशानभूमीत अतिक्रमण
बसपा आक्रमक ; ग्रामस्थांसह साखळी उपोषण
खेड, ता. ११ ः तालुक्यातील कोंडीवली-बौद्धवाडी येथील स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण हटवून तत्काळ स्मशानभूमीसाठी जागा मोकळी करून द्या, अशी मागणी गेले ८ महिने करण्यात येत असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोंडीवली ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करणार आहेत, अशी माहिती बसपाचे पदाधिकारी प्रदीप कांबळे यांनी दिली.
शहरातील आंबेडकर भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी कांबळे यांच्यासह चंद्रकांत तांबे, सुनील सकपाळ, सिद्धार्थ कापसे, शशिकांत कापसे, संतोष तांबे, संजना तांबे, बसपाचे समीर भुवड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोंडीवली-बौद्धवाडीतील स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्यामुळे २६ जानेवारी २०२२ व १ मे २०२२ ला बसपा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग पत्करला होता. या वेळी प्रशासनाने अतिक्रमण झाल्याची बाब मान्य करून या जागेवर झालेले अतिक्रमण तत्काळ हटवून जागा मोकळी करून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र या आश्वासनाची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही अद्याप केलेली नाही. अतिक्रमण झालेल्या जागेची (गावठाणची) मोजणी व्हावी, अशी मागणी असतानाही ती देखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते कोंडीवली ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनापासून साखळी उपोषण सुरू करणार आहेत. या वेळी जोपर्यंत न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86239 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..