पान एकसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एकसंक्षिप्त
पान एकसंक्षिप्त

पान एकसंक्षिप्त

sakal_logo
By

सावंतवाडीत उद्या
जनजागृती फेरी
सावंतवाडी, ता. ११ ः शहरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ''हर घर तिरंगा'' मोहिमेंतर्गत येथील पोलिस ठाण्याच्या वतीने १३ ला सकाळी जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. रॅलीत मिलाग्रीस पोलिसांसह हायस्कूलचे आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. ''हर घर तिरंगा''च्या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून रॅली काढल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिस प्रशासनाकडून ही फेरी काढण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्याचा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे.
---

कणकवलीत २१ ला
राज्य सेवा पूर्व परीक्षा
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ ऑगस्टला होणार आहे. कणकवली येथील विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला आणि कणकवली कॉलेज या दोन केंद्रावर या परीक्षेचे आयोजन केले आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षंची वेळ सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी असून परीक्षेस एकुण ६०२ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली KD००१००१ ते KD००१४३२ व कणकवली कॉलेज कणकवली, (जुनी इमारत) KD००२००१ ते KD००२१७० या २ उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

किरकोळ रॉकेल
विक्री दर
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः जिल्ह्यात ऑगस्टकरिता किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दीप्ती धालवकर यांनी जाहीर केले असून तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर ८५.९५ रुपये ते ८६.९० रुपये या दरम्यान राहणार आहेत.
-----------
कणकवलीत
सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३१.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १९.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी २३३४.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ११.८ (१९६९.७), मालवण- १५.२ (२१५६.७), सावंतवाडी- २३ (२६१४), वेंगुर्ले- १२.५ (२२३२.१), कणकवली- ३१.६ (२४१९.२), कुडाळ- १३.३ (२४३०.८), वैभववाडी- ३०.४ (२६३६.१), दोडामार्ग- ३०.४ (२५७९.५) असा पाऊस झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86243 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..