साखरपा-हवाईदल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधली राखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-हवाईदल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधली राखी
साखरपा-हवाईदल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधली राखी

साखरपा-हवाईदल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधली राखी

sakal_logo
By

L42973 ः संग्रहीत
........
कर्तव्य, सेवाभावाला वंदन; अनोखे रक्षाबंघन

हवाईदल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधली राखी; कबनूरकर स्कूलचा उपक्रम, विद्यार्थ्यांचे कौतुक
साखरपा, ता. ११ ः भावाबहिणीच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन हा कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. या वेळी हवाईदल अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्‍यांना राख्या बांधून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यात आला.
रक्षाबंधन हा सण कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवत साजरा केला. या वेळी साखरपा पोलिस आउटपोस्ट येथे जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांना मुलींनी राख्या बांधल्या. उपनिरीक्षक विद्या पाटील यांना राखी बांधली. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत पोलिसदल महत्वाची कामगिरी बजावत असतात. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन करण्यात आले.
गेली दोन वर्षे कोरोना काळात आरोग्य विभागाने भरीव कामगिरी केली. कोरोना रुग्णांच्या सेवेपासून विद्यार्थ्यांच्या लसीकरणापर्यंत आरोग्य कर्मचारी सातत्याने आघाडीवर होता. याची जाणीव म्हणून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या.
देवरूख येथील शहीद स्मारकात युद्धविमान मंजूर झाले आहे. या विमानाच्या बसवण्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी हवाईदलाचे दोन अधिकारी सध्या देवरूख येथे आले आहेत. सार्जंट आशीष नरवाल आणि सार्जंट मंगलचंद हे दोन अधिकारी हैद्राबाद येथून आले आहेत. त्यांची भेट कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांना राख्या बांधल्या. या वेळी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत हे उपस्थित होते. सदानंद भागवत यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
..
कोट
समाजासाठी कायम तत्पर असणाऱ्या या तीनही विभागातील कर्मचाऱ्यांना राख्या बांधून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला
- लिना कबनूरकर, मुख्याध्यापिका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86245 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..