रत्नागिरी ः विधिमंडळाच्या महत्वाच्या समितीवर उदय सामंतांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  विधिमंडळाच्या महत्वाच्या समितीवर उदय सामंतांची निवड
रत्नागिरी ः विधिमंडळाच्या महत्वाच्या समितीवर उदय सामंतांची निवड

रत्नागिरी ः विधिमंडळाच्या महत्वाच्या समितीवर उदय सामंतांची निवड

sakal_logo
By

-rat11p21.jpg-
४२५३०
उदय सामंत

विधिमंडळ समितीवर
उदय सामंतांची निवड

रत्नागिरी, ता. ११ः मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेले उदय सामंत यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान आणखी मजबूत झाले आहे. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवड केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक महत्त्वाचा मंत्री म्हणून उदय सामंत यांना महाराष्ट्र ओळखू लागला आहे. शिवसेनेत राजकीय भूकंप झाल्यानतंर सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि या सर्व घडामोडी घडत गेल्या. अल्पावधीत त्यांना उपनेते आणि नंतर प्रवक्तेपद देण्यात आले. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाची ही सर्वात महत्त्वाची समिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याची या समितीवर निवड केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86248 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..