राजापूर- आज कार्यक्रम संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर- आज कार्यक्रम संक्षिप्त
राजापूर- आज कार्यक्रम संक्षिप्त

राजापूर- आज कार्यक्रम संक्षिप्त

sakal_logo
By

राजापुरात आज काँग्रेसची पदयात्रा
राजापूरः तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती (कै.) सदानंद चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) सकाळी १०.३० वाजता राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये शोकसभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा फेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी केले आहे.
-------------
राजापुरात देशभक्तीपर गीत कार्यक्रम
राजापूर ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने येथील नगर पालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११.३० वाजता कराओके देशभक्तीपर गीतांचे आयोजन केले आहे. शहरातील पिकअप् शेडच्या सभागृहामध्ये होणाऱ्या या गीतगायनामध्ये जास्तीत जास्त गायकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
--------------
राजापुरात उद्या समूहगीत गायन स्पर्धा
राजापूर ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी (ता. १३) नगरपालिका हद्दीतील शाळांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्री मंगल कार्यालयामध्ये सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार असून यामध्ये जास्ती जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केले आहे.
---------------
खेडमध्ये सहकार साक्षरता दिन
खेड ः तालुक्यातील पतसंस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सहकाराच्या माध्यमातून १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत द. ग. तटकरे सभागृहात सहकार आर्थिक साक्षरता दिनाचे आयोजन केले आहे. पतसंस्थाचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुक्यातील सर्व नागरी सहकारी, पतसंस्थांनी केले आहे.
---------
खेडमध्ये आज रचना-मुल्यनिर्धारण बैठक
खेड ः खेड नगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना तयार करण्याची कार्यवाही चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागामार्फत मते नोंदवण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सुधारित विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय संस्था, सामाजिक संस्था, वास्तू विशारद आदींनी सहभागी होऊन मत नोंदवणे आवश्यक आहे. नगर पालिकेच्या सुधारित विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86289 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..