चिपळूण- नितीन गडकरी यांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण- नितीन गडकरी यांना साकडे
चिपळूण- नितीन गडकरी यांना साकडे

चिपळूण- नितीन गडकरी यांना साकडे

sakal_logo
By

ratchl११३.jpg-
L42548
चिपळूणः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
-----------
सावर्डे बाजारपेठेत सिंगल पिलर पुलाची मागणी
शेखर निकम यांनी घेतली गडकरींची भेट ; दर्जा हवा उत्तम
चिपळूण, ता. ११ ः राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालू आहे. घाटमाथ्याचे असल्याने ते दर्जेदार व्हावे व चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेतील आरईवॉल व्हीयुपीचा पूल रद्द करून तेथे सिंगल पिलर पुलाचे बांधकाम आणि इतर महामार्गाच्या समस्यांबाबत चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
सावर्डे गाव हे ५४ गावांचे केंद्र आहे. या गावांची मुख्य बाजारपेठ सुमारे १४ हजार लोकसंख्या असलेले सावर्डे आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. कारण, येथे शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आहेत. सावर्डे येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.सावर्डे मार्केटमधील चौकोनी चौकाखाली सलग दोन अंडरपास (व्हीयूपीएस) मंजूर केले आहेत. आरई भिंतींमुळे व्यापारी आणि लगतच्या गावातील स्थानिक ग्रामस्थ/रहिवासी यांची गैरसोय होणार आहे. सावर्डे गावातील ग्रामस्थांनी आरई वॉल व्हीयुपी पुलांऐवजी बाजारपेठेत विहित लांबीच्या एकाच खांबावर उड्डाणपूल बांधावा. यामध्ये सिंगल पिलर पुलासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाची मागणी आहे; मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हा पूल रद्द करून तो सिंगल पिलर पूल व्हावा, अशी नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांची तीव्र इच्छा आहे. आरई वॉल व्हीयूपी पूल बांधल्यास बाजारपेठ दोन भागात विभागली जाईल आणि ९० टक्के व्यापाऱ्यांच्या व्यवसायाच्यादृष्टीने हे धोक्याचे ठरणार आहे.
हा पूल रद्द करून महामार्गावरील समस्यांचा विचार करून सावर्डे येथे सिंगल पिलर पूल बांधण्याचा निर्णय तातडीने घ्यावा व यात सावर्डे बाजारपेठेतील लांबीचा सिंगल पिलर उड्डाणपूल मंजूर करण्यात काही अडचण येत असल्यास नागरिकांच्या मागणीचा विचार करून सावर्डे मार्केट लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण, रुंदीकरण मंजूर करावे, अशी मागणी या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांच्याद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून यावर सकारात्मक चर्चा झाली. या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांच्यासोबत बाबाजी जाधव, अजित यशवंतराव हे उपस्थित होते.

चौकट
भेट ठरणार फलदायी
गेली सहा, सात वर्षे चौपदरीकरणाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे हे जोखमीचे व धोकादायक होत चालले आहे. या मार्गाने शिमगा, गौरी गणपती, लग्नसराई यासाठी मुंबई चाकरमान्यांची ये-जा होत असते; परंतु चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालू असल्याने तसेच झालेले काम हे दर्जाहीन असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरड कोसळणे, रस्त्याला भेगा पडणे या समस्यादेखील भेडसावत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची हा मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावा, उत्तम दर्जाचा व्हावा, अशी मागणी असल्याने ही भेट फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86290 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..